Abroad Job News : ‘या’ देशात कोट्यवधींचं पॅकेज देऊनही मिळत नाहीत कामगार; काय आहे कारण?

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात माणसं कमी आणि काम जास्त अशी स्थिती आहे. तर याउलट (Abroad Job News) नोकरीच्या संधी कमी असल्याने भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जास्त पगार देऊनही एखाद्या साध्या कामासाठी प्रदेशात कामगार मिळत नाहीत. ऑस्ट्रेलियात एका साध्या कामासाठी वर्षाला सुमारे एक कोटी रुपये दिले जात आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम ऑफर करुनही या कामासाठी कामगार मिळत नसल्याची समस्या आहे. तेथे सफाई कामासाठी कामगारांची गरज आहे; पण महिन्याला काही लाखांचं पॅकेज देऊनही तेथे सफाई कामगार मिळत नाहीत हे ऐकलं तर विश्वास बसणार नाही.

कामगारांना आकर्षित करण्यासाठी 90,000 डॉलरचं पॅकेज

ऑस्ट्रेलियामध्ये कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे नवीन सफाई कामगारांना कंपन्यांकडून दरवर्षी 90,000 डॉलर (सुमारे 72 लाख रुपये) पेक्षा जास्त वेतन दिले जात आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सिडनीस्थित (Abroad Job News) क्लिनर कंपनी अॅब्सोल्युट डोमेस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांना इतके पैसे द्यावे लागत आहेत.

कोणताही अनुभव नसलेल्या सफाई कामगाराला जो आठवड्यातून पाच दिवस आणि दिवसाचे आठ तास काम करतो त्याला वार्षिक 93,600 डॉलर (अंदाजे 75 लाख रुपये) पगार देण्याची तरतूद आहे. एवढा मोठा पगार असूनही कामं करायला लोक मिळत नाहीत; हे विशेष.

2021 पासून कामगारांची कमतरता (Abroad Job News)

अॅब्सोल्युट डोमेस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मते, 2021 च्या मध्यापासून त्यांना व्यावसायिक सेवेसाठी पुरेसे क्लिनर मिळू शकले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी तासाचा दर 35 डॉलर पर्यंत वाढवला होता. पण त्याचाही काही चांगला परिणाम झाला नाही.

सिडनीत कामगार शोधण्यासाठी कंपन्यांची धडपड

सिडनीच्या काही भागात अजूनही सफाई कामगार शोधण्यासाठी धडपड सुरू आहे. अ‍ॅबसोल्युट डोमेस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अधिक तास काम करण्याची परवानगी देण्यासाठी सरकारकडे विनंती करत आहेत. दरम्यान, इतर सफाई कामगार पुरवणाऱ्या कंपन्याही जास्त पगार देत आहेत. तिथली शहरी कंपनी यापूर्वी (Abroad Job News) एका तासाला 35 डॉलर पगार देत होती, पण आता तिथे कर्मचाऱ्यांना 40 डॉलर ते 54.99 डॉलर प्रति तास पगार दिला जात आहे. मात्र ही रक्कम लवकरच तासाला 60 डॉलर पर्यंत पोहचू शकते. याचा अर्थ असा; की फर्मसाठी पूर्ण वेळ काम करणारा क्लिनर वार्षिक 1,24,800 डॉलर कमवेल. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे एक कोटी रुपये आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com