Xiaomi Layoff : ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार डच्चू; कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 पेक्षा कमी करण्याचा प्लॅन

करिअरनामा ऑनलाईन । सर्वत्र नोकर कपातीचे वारे वाहत (Xiaomi Layoff) असताना आता स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi India साठी देखील मागील काही काळ चांगला राहिला नाही. भारतातील घटत्या बाजारपेठेचे आव्हान कंपनीसमोर उभे असताना कंपनीला सरकारी यंत्रणांच्या कठोरतेलाही तोंड द्यावे लागत आहे. परिणामी कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे.

ET च्या अहवालानुसार Xiaomi India आपल्या व्यवसायाच्या संरचनेत बदल करत आहे. हे बदल करत असताना कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास (Xiaomi Layoff) सुरवात केली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 च्या खाली आणण्याची कंपनीची योजना आहे.

गेल्या आठवड्यात 30 कर्मचाऱ्यांची केली सुट्टी (Xiaomi Layoff)
या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीत सुमारे 1400 ते 1500 कर्मचारी होते. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, कंपनीने 30 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते आणि आता (Xiaomi Layoff) हळूहळू एकूण कर्मचार्‍यांची संख्या 1,000 च्या खाली आणण्याचा प्रयत्न करत आहे; याचा अर्थ 30 टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांना नोकरी गमवण्याचा धक्का बसू शकतो.

काय आहे कारण? (Xiaomi Layoff)
एका अहवालानुसार वर्तमान आणि माजी कर्मचार्‍यांनी सांगितले की बाजारातील हिस्सा कमी झाल्यामुळे आणि सरकारी एजन्सींच्या सखोल तपासामुळे ही नोकर कपात होत आहे. कर्मचाऱ्यांचे (Xiaomi Layoff) म्हणणे आहे की, पुनर्रचनेमुळे बहुतांश निर्णय घेण्याचे अधिकार Xiaomi इंडियाच्या चिनी मूळ कंपनी Xiaomi कडे गेले आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून ते कर्मचारी कमी करत आहे.
दरम्यान Xiaomi प्रवक्त्याने असं सांगितलं आहे; की जेव्हा गरज पडेल तेव्हा कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com