12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत? उच्चस्तरीय बैठकित ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशातच 12 वी च्या परिक्षांसदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. 12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत याबाबत उच्चस्तरीय बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी, सध्या सुरू असलेली कोरोना साथीची परिस्थिती आणि मुलांना या नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन रुट” चा पर्याय आहे. त्याची सक्रियपणे तपासणी केली पाहिजे असं मत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडले आहे. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.

मुलांचे आरोग्य आणि त्यांचे भवितव्य अन त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता याला आपली प्राधान्यता असणे जास्त आवश्यक आहे. साथीचे रोग सुरु असताना विद्यार्थी आणि पालक परीक्षेला बसण्यासंबंधी चिंता व्यक्त करत आहेत. बहुतेक व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी परीक्षा घेत असतात म्हणून बऱ्याच तज्ज्ञांचे मत आहे की मूल्यांकन मॉडेलच्या आधारे १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे शक्य आहे अशी वर्ष गायकवाड यांनी सांगितले आहे.

विद्यार्थी 14 महिन्यांहून अधिक काळ झाला इयत्ता बारावीमध्ये शिकत आहेत. व्यक्तिशः माझा असा विश्वास आहे की आपण परीक्षेसंबंधीची अनिश्चितता दूर केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला हवा आहे. आमचे लक्ष आता युनिफॉर्म अ‍ॅसेसमेंट पॉलिसी विकसित करण्यावर, सर्व शिक्षक आणि पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण, आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळा, महाविद्यालये परिसर सुरक्षितपणे पुन्हा सुरू करणे यावर असल्याची माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर बैठकीस शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय मंत्री स्मृती इरानी, प्रकाश जावडेकर तसेच सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशांतील शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, परिक्षांचे आयोजन करणार्‍या बोर्डांचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर सर्व राज्यांतील शिक्षणबाॅर्ड, CBSE, ICSE यांनी 12 वी च्या परिक्षांना स्थगिती दिली होती. केंद्रीय मंत्री पोखरियाल यांनी 30 मे रोजी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 12 वी च्या परिक्षांसंदर्भात पुढील निर्णय सांगण्यात येईल असे सांगितले होते.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com