UPSC Success Story : तिने 6 सरकारी नोकऱ्या सोडल्या, स्वप्न होतं IPS होण्याचं; पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश अन् बनली अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा ही देशातील सर्वात (UPSC Success Story) आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दररोज 14 ते 15 तास अभ्यास करतात. एवढी मेहनत करूनही अनेक उमेदवार पास होऊ शकत नाहीत. तर असेही अनेक उमेदवार आहेत जे UPSC परीक्षा पास होण्यासाठी चांगली नोकरीही सोडतात. अशीच एक तरुणी आहे तृप्ती भट्ट… जिने UPSC पूर्ण करण्यासाठी इतर चांगल्या नोकऱ्यांची ऑफर धुडकावली आहे.

अशी आहे IPS तृप्ती भट्टची गोष्ट (UPSC Success Story)
अल्मोडा येथील रहिवासी असलेल्या IPS तृप्ती भट्ट हीचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला. चार भावंडांमध्ये ती सर्वात मोठी होती. बीरशेबा शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केंद्रीय विद्यालयातून बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर पंतनगर विद्यापीठात बी.टेक कोर्सला प्रवेश घेतला. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तृप्तीने सहा सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षाही पास केल्या आहेत. यामध्ये इस्रो सह अनेक सरकारी आणि खासगी संस्थांच्या परीक्षांचाही समावेश आहे.

एपीजे अब्दुल कलाम आहेत आदर्श
IPS तृप्ती भट्ट भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यापासून खूप प्रेरित झाली आहे. इयत्ता नववीत शिकत असताना डॉ.अब्दुल कलाम यांच्याशी तिची भेट झाली होती. डॉ. कलाम यांनी (UPSC Success Story) तिला स्वतःच्या हाताने लिहिलेले पत्र दिले होते. हे पत्र  वाचून तृप्ती खूप प्रेरित झाली. ही प्रेरणा घेवून तृप्तीने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी UPSCची तयारी सुरू केली.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
IPS अधिकारी होण्याचे तृप्तीचे लहानपणीचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण (UPSC Success Story) करण्यासाठी तिने रात्रंदिवस मेहनत केली. या मेहनतीचे फळ म्हणून पहिल्याच प्रयत्नात तृप्ती १६५ वा क्रमांक मिळवून IPS अधिकारी बनली. IPS तृप्ती भट्टने राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन (16 किमी आणि 14 किमी) आणि बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय तायक्वांदो आणि कराटेमध्येही तिने पहिला क्रमांक पटकावला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com