UPSC Success Story : पेपरला जाताना ऍक्सिडेंट झाला तर इंटरव्ह्यु दिवशी आजारी पडला; हार न मानता जिद्दीने बनला देशातील ‘तरुण IPS’

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सफीन हसन हा (UPSC Success Story) हरहुन्नरी तरुण. तो यूपीएससीच्या (UPSC) परीक्षेला निघाला असताना त्याचा भीषण अपघात झाला, पण हार न मानता तो उठला आणि त्याने थेट परीक्षा केंद्र गाठले. वेदनांशी झुंज देत त्याने संपूर्ण पेपर लिहिला आणि चमत्कारच झाला… सफीन हसन पास झाला होता… आणि सोने पे सुहागा म्हणतात तसं पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा तो चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झाला होता. सफीनने लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले होते आणि अगदी कमी वयात तो आयपीएस (IPS) अधिकारी बनला.

22 व्या वर्षी बनला IPS
आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या अनेक प्रेरणादायी कथा आपण दररोज वाचतो आणि ऐकतो. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो.. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची (UPSC Success Story) एक अनोखी कथा असते. अशीच एक कथा आहे सफीन हसन (IPS Safin Hassan) या तरुणाची. तो भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी आहे. सफीन हसनने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली आणि तो सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.

यांना’ समोर ठेवून ध्येय ठरवले
12 जुलै 1995 रोजी सफीनचा जन्म झाला. त्याचे शालेय शिक्षण गुजरातमधील पालनपूर येथील एस. के. एम. हायस्कूलमध्ये झाले. एका घटनेने सफीनच्या मनात आयुष्यात उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे ध्येय निर्माण झाले. सफीन ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेत एका कलेक्टरने त्याच्या शाळेला भेट दिली होती. त्यावेळी एका IAS अधिकाऱ्याला दिलेला आदर, मान सन्मान पाहून सफीन थक्क झाला. यावेळीच त्याच्या मनात आले, की मोठे झाल्यानंतर आपणही असेच उच्च पदावर अधिकारी बनायचे.

2017 मध्ये दिली पहिल्यांदा परीक्षा (UPSC Success Story)
सफीन कॉलेजमध्ये शिकत असताना त्याने यूपीएससी परीक्षा देण्याची मानसिक तयारी केली होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो यूपीएससी कोचिंगसाठी दिल्लीला गेला आणि दोन वर्षे त्याने तेथेच राहून अभ्यास केला. सफीनने 2017 मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला बसण्यासाठी पहिल्यांदा अर्ज केला होता. यश मिळवण्यासाठी त्याचा कसून अभ्यास सुरु होता.

पेपरला जाताना झाला भीषण अपघात
अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. यादिवशी परीक्षा केंद्रावर जात असताना हसनचा भीषण अपघात झाला. त्याला गंभीर जखम झाली होती; पण याकडे त्याने लक्ष न देता तो अपघातानंतर सरळ उठून परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी गेला. वाचकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, की त्याच्या जखमा इतक्या (UPSC Success Story) गंभीर होत्या की तपासणी केल्यानंतर उपचारासाठी लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. अंगावर जखमांच्या वेदना सोसत त्याने पेपर लिहला होता. सफीनची अभ्यासातील मेहनत आणि मनातील जिद्दीने त्याला लेखी परीक्षेत यश मिळवून दिले.

आजारी असताना दिला इंटरव्ह्यु (UPSC Success Story)
UPSC च्या पेपरला जात असताना अपघात घडला ही गोष्ट कमी होती की काय म्हणून आणखी एक संकट त्याच्यावर कोसळलं. संघ लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पूर्व आणि मुख्य परिक्षेत सफीनला भरघोस यश मिळाले होते. यानंतर मुलाखत फेरी होणार होती. त्याला मुलाखतीपूर्वीच आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारींना सामोरे जावे लागले होते. त्याच्यावर उपचार सुरु होते. तरीही त्याने हार न मानता मुलाखतीला हजेरी लावली. इंटरव्ह्यु पॅनेलने विचारलेल्या प्रश्नांना त्याने चाणाक्ष उत्तरे दिली. यूपीएससी सीएसई (UPSC CSE) मुलाखतीत त्याने 2 रा क्रमांक पटकावला आणि त्याचवेळी त्याने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या अंतिम निकालात संपूर्ण भारतात 570 वा क्रमांक मिळवला होता. याचा परिणाम म्हणून त्याची देशाच्या पोलीस विभागात IPS पदावर निवड झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com