करिअरनामा ऑनलाईन । प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत विलक्षण (UPSC Success Story) यश मिळवणाऱ्या लोकांच्या कथा खूप प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी असतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे प्रेमसुख देलू यांची, जे एकेकाळी गुरंढोरं राखायचे. हो.. हे खरं आहे. गुरं राखणारे प्रेमसुख आज IPS अधिकारी बनले आहेत. जाणून घेवूया त्यांचा प्रवास कसा होता याविषयी….
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची
राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील नोखा तहसीलमधील रायसर नावाच्या एका छोट्या गावात देलू कुटुंबीय वास्तव्य करतात. प्रेमसुख देलू यांचा जन्म 3 एप्रिल 1988 रोजी झाला. त्यांच्या (UPSC Success Story) कुटुंबाला शेतीची पार्श्वभूमी आहे पण पुरेशी शेत जमीन नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर खर्च भागत नव्हता. यासाठी त्यांचे वडील उंटाची गाडी चालवत आणि शेतीची साधने घेऊन जात. आर्थिक संकटे समोर उभी होती. यातून मार्ग काढण्यासाठी प्रेमसुखने सरकारी नोकरीत सामील होण्याचा विचार केला.
गुरं राखण्यासोबत केला अभ्यास
प्रेमसुख देलू (IPS Premsukh Delu) यांना सरकारी सेवेत दाखल व्हायचे होते. यासाठी त्यांना खूप अभ्यास करायला लागणार होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते कुटुंबाला हातभार लागावा यासाठी काम करत. एवढच नव्हेतर लहानपणी ते गुरे पाळण्याचे काम करायचे. गुरे राखण्यासोबतच त्यांचा अभ्यास सुरू होता.
6 वर्षात मिळाल्या 12 सरकारी नोकऱ्या
आपल्या अथक परिश्रमाने प्रेमसुख यांनी 6 वर्षात 12 सरकारी नोकऱ्या मिळवल्या. सुरुवातीला त्यांची बिकानेरमध्ये पटवारी म्हणून नियुक्ती झाली होती, पण त्यांना मोठे यश मिळवायचे होते म्हणून त्यांनी इतर स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यानंतर राजस्थान येथे झालेल्या ग्रामसेवक परीक्षेत त्यांनी दुसरा क्रमांक (UPSC Success Story) पटकावला. त्यानंतर राजस्थान पोलिसात उपनिरीक्षक पदासाठी निवड होऊनही त्यांनी हे पद न स्वीकारता राजस्थान सहायक कारागृह तुरुंग परीक्षेत यश मिळवून सहाय्यक जेलरच्या नोकरीला प्राधान्य दिले.
IPS होण्याचा ध्यास पूर्ण झाला
प्रेमसुख यांनी काही काळ शिक्षण विभागात शालेय अधिव्याख्याता म्हणून काही काळ काम केले आहे. त्यांचे स्वप्न आणखी मोठी ध्येय साध्य करण्याचे होते, म्हणून त्यांनी UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. 2015 मध्ये त्यांनी UPSC ची दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण भारतातून 170 वी रॅंक प्राप्त केली आणि ते IPS अधिकारी बनले.
IPS प्रेमसुख देलू यांना गुजरात केडर देण्यात आले होते (UPSC Success Story) आणि सुरुवातीला ते अमरेली, गुजरात येथे SP म्हणून तैनात होते. सध्या ते जामनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अशाप्रकारे, आयपीएस प्रेमसुख देलू यांची कथा ही यश आणि अथक परिश्रम आणि दृढनिश्चयाचे उत्तम उदाहरण आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com