UPSC Success Story : जिंकलस!! हिंदी सिनेमातून प्रेरणा घेतली आणि सामान्य कॉन्स्टेबल तरुण थेट बनला IPS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येक तरुणाची ऑफिसर होण्याची (UPSC Success Story) कहाणी असते. आज आपण मनोज रावत यांच्या विषयी जाणून घेणार आहोत; ज्यांनी बॉलिवूड चित्रपटामधून प्रेरणा घेऊन कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी बनण्याचा प्रवास पूर्ण केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या तरुण तडफदार अधिकाऱ्याची कहाणी.

कोण आहेत मनोज रावत?
मनोज हे मूळचे राजस्थानच्या जयपूर येथील श्यामपूर गावचे रहिवासी आहेत. मनोज यांचे वडील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. 2008 मध्ये मनोजच्या वडिलांची (UPSC Success Story) नोकरी गेली, त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी मनोज यांच्यावर आली. जबाबदारीची जाणीव ठेवत मनोज यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी नोकरी करायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबातील तीन भावंडांमध्ये ते सर्वात मोठे आहेत.

वयाच्या 19 व्या वर्षी मिळवले कॉन्स्टेबल पद
मनोज यांच्या वडिलांची नोकरी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पैसे मिळवण्यासाठी नोकरी मिळणं गरजेचं होतं. मनोज यांनी मेहनत केली आणि परीक्षा दिली आणि ते राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल पदावर भरती झाले. यावेळी त्यांचं वय अवघं 19 वर्ष होतं. त्याचवेळी त्यांनी नोकरीसोबतच अभ्यासही सुरू ठेवला. यानंतर त्यांनी राज्यशास्त्रमधून MA पूर्ण केले. 2013 साली त्यांची कोर्टात लिपिक म्हणून निवड झाली. अशा परिस्थितीत त्यांनी हवालदार पदाचा राजीनामा दिला लिपिकाच्या नोकरीत ते रुजू झाले.

CISF ची नोकरी नाकारली (UPSC Success Story)
मनोज शिकत असताना त्यांना एकदा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) नोकरीची संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी ही संधी नाकारली. कारण त्यांना आयुष्यात यापेक्षा काहीतरी मोठं करायचं होतं. यासाठी त्यांनी स्वत:ला एखाद्या चौकटी पुरते मर्यादित ठेवले नाही; आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणखी प्रयत्न सुरूच ठेवले.

हिन्दी चित्रपट ‘इंडियन’पासून घेतली प्रेरणा
एका मुलाखतीत मनोज रावत यांनी सांगितले होते की, ते अभिनेता सनी देओलचे चाहते आहेत. सनी देओलचा इंडियन चित्रपट पाहिल्यानंतर ते खूप प्रभावित झाले होते. येथूनच त्यांना आयपीएस बनण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून 2019 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा दिली, ज्यामध्ये त्यांनी (UPSC Success Story) संपूर्ण भारतातून 544 व्या क्रमांकासह यश संपादन केले. यामुळे त्यांना आयपीएस अधिकारी होण्याची संधी मिळाली. आधी कॉन्स्टेबल, नंतर लिपिक; पुढे जावून मनोज यांना CISF मध्ये नोकरीची संधी मिळाली; पण त्यांचं ध्येय मोठं होतं. म्हणून त्यांनी नोकरी करत असताना UPSC परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला आणि त्याबरोबरच कुटुंबाचीही जबाबदारी उत्तम तऱ्हेने पेलली. त्यांची ही कहाणी आजच्या प्रत्येक युवकाला प्रेरणा देणारी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com