UPSC Success Story : घरची बेताची परिस्थिती; पण मुलीनं जिद्द सोडली नाही; IPS होवून इतिहासच घडवला!!

करिअरनामा ऑनलाईन । बिस्मा लहानपणापासून अभ्यासात (UPSC Success Story) हुशार होती. शाळेत ती नेहमी टॉप करायची. नंतर तिने इलेक्ट्रॉनिक्समधून बी. ई. केले आणि इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. ती एक उत्तम चित्रकलाकारही आहे. काश्मीरमधील तरुणी बिस्मा IPS झाली आणि तिने इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करुन दाखवले. सध्या बिस्माच्या कर्तृत्वामुळे तिला स्वतःची वेगळी ओळख मिळाली आहे. तिला आता कोणत्याही प्रसिद्धीची गरज नाही. पण हे यश मिळवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.

‘आईने मला नागरी सेवेत भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिलं’
खरे पाहता बिस्माचे वडील मोहम्मद शफी काझी एक छोटेसे दुकान चालवतात. बिस्माला शाळेत पाठवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. पण त्यांनी कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही आणि बिस्माला चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले. बिस्मा म्हणते की, “इंजिनिअर होवून तिला खासगी क्षेत्रात चांगली नोकरी मिळू शकली असती. पण तिच्या आईने तिला UPSCची परीक्षा देण्यासाठी प्रेरणा दिली.

घरीच राहून केला अभ्यास (UPSC Success Story)
2015 मध्ये तिने UPSCची तयारी सुरु केली. यासाठी ती आपले कुटुंब सोडून दिल्लीत आली, पण इथे ती जास्त दिवस राहिली नाही. घरी जावून अभ्यास करणे तिला योग्य वाटले. बिस्मा सांगते की तिच्या परीक्षेच्या वेळी श्रीनगरमध्ये बंद पुकारला होता. तिचे वडील कसेतरी तिला परीक्षा केंद्रावर गहेवून जायचे. अशा परिस्थितीत बिस्माने परीक्षा दिली.

काश्मीरच्या मुलींसाठी बनली प्रेरणा
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने सुरवातीला पूर्व परीक्षा पास केली. नंतर (UPSC Success Story) तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी उत्तीर्ण केली. वाटेत येणाऱ्या अडचणींसमोर गुडघे टेकणाऱ्या तरुणांसाठी बिस्मामधील जिद्द प्रेरणा बनली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com