UPSC Success Story : वडिलांची हत्या.. UPSC चा कठोर अभ्यास.. सुरु होती तारेवरची कसरत; जिद्दीने बनला IPS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Success Story) दरवर्षी देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेसचे आयोजन करते. ही परीक्षा अशी आहे जीथे तुमच्या मेहनतीसोबतच तुमच्या चिकाटीची आणि सातत्याचीही कसोटी लागते. या परीक्षेसाठी लाखो तरुण अर्ज करतात. या परीक्षेत संयमाने तयारी करणाऱ्यांनाच यश मिळते. या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. तरीही तरुण वर्ग वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी करत रात्रंदिवस मेहनत घेतात. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी, काहीजण आपल्या कुटुंबापासून लांब राहून अभ्यास करतात. तर काहीजण 9 ते 5 नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत तयारी करतात. नागरी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील तरुणांच्या प्रेरणादायी आणि विलक्षण कथा आपल्याला वाचायला मिळतात. यातील एक कथा बजरंग यादव (IPS Bajrang Yadav) यांची आहे. त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती आणि त्यानंतर त्यांना नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याचे वेड लागले. आज या लेखाद्वारे आपण बजरंग यादवची कहाणी जाणून घेणार आहोत.

वडिलांची हत्या करणाऱ्या नाराधमांना शिक्षा देण्याची घेतली शपथ
अनेकदा एखाद्या वाईट अनुभवातूनही आपल्यासाठी चांगलं काहीतरी निर्माण होतं. असे अनेक खरे किंवा खोटे किस्से आपण याआधीही ऐकले किंवा चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून पाहिले असतील. अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी बजरंग यादव यांच्या वडिलांसोबत घडली. काही गुंडांनी त्यांची हत्या केली, त्यावेळी बजरंग यादव यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वडिलांची हत्या करणाऱ्या नराधमांना एक दिवस (UPSC Success Story) शिक्षा करणार असल्याची शपथ घेतली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. या परीक्षेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले. ते यूपीएससी पास करून आयपीएस (IPS) अधिकारी बनले आहेत.

अशी झाली वडिलांची हत्या
बजरंग यादव यांचे वडील शेतकरी होते. बजरंग यांनी (UPSC Success Story) अधिकारी व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेसाठी बजरंगने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०१९ च्या परीक्षेच्या तयारीसाठी बजरंग दिल्लीला गेले होते. त्याचवेळी बजरंग यांच्या वडिलांनी नेहमीप्रमाणे अनेक गरीब-गरजू लोकांना मदत केली म्हणून काही गुंडांनी त्यांची हत्या केली. बजरंग पहिल्या परीक्षेसाठी तयारी करणार असताना त्यांच्या वडिलांचा खूण झाला होता. त्यानंतर बजरंग हे खूप खचून गेले. वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून बजरंग यांना बाहेर यायला खूप वेळ लागला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि यानंतर त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेची तयारी सुरू केली.

दिल्लीत जावून केला UPSC चा अभ्यास
बजरंग यादव हे उत्तर प्रदेशातील बस्ती येथील धोभाट गावचे (UPSC Success Story) रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बस्ती येथील बहादूरपूर येथे झाले. त्यांनी २०१४ मध्ये १०वी उत्तीर्ण केली असून २०१६ मध्ये १२वी उत्तीर्ण केली. तसेच बजरंग यांनी प्रयागराज विद्यापीठातून गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि ते यामध्ये अव्वल ठरले आहेत. यानंतर ते दिल्लीला गेले आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

नागरी सेवेची आवड डोक्यात गेली
वडिलांच्या हत्येनंतर बजरंग पूर्णपणे तुटले होते. यानंतर त्यांना नागरी सेवा उत्तीर्ण होण्याचे वेड लागले. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस अभ्यास सुरू केला.

प्रिलिममध्ये फक्त दीड गुणांनी नापास (UPSC Success Story)
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर बजरंग यांनी दुसरा प्रयत्न केला. पण यावेळी पूर्वपरीक्षा अवघ्या दीड गुणांनी ते नापास झाले. त्यांनी हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नाची तयारी सुरू केली.

वयाच्या २१ व्या वर्षी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण
बजरंग यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पूर्व परीक्षा दिली तेव्हा ते फक्त 21 वर्षांचे होते; जे नागरी सेवांमध्ये सामील होण्याचे किमान वय आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती हे विशेष म्हणावे लागेल. यानंतर त्यांच्याकडून कुटुंबाच्या अपेक्षा वाढल्या, पण ते मुख्य परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत.

तिसऱ्या प्रयत्नात UPSC मध्ये मिळाले यश
वडिलांच्या हत्येनंतर बजरंग यांनी IPS होण्याची चांगलीच जिद्द (UPSC Success Story) बाळगली होती. त्यांनी परीक्षेचा तिसरा प्रयत्न केला आणि यावेळी त्यांनी प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू पर्यंत मजल मारली. निकाल जाहीर झाल्यावर ते मित्रांसह निकालाची वाट पाहत होते. बजरंग यांच्या म्हणण्यानुसार निकालाच्या पीडीएफमध्ये त्यांच्या नावाची फक्त तीन अक्षरे लिहिली होती, त्यानंतर त्यांचे नाव आले. हे पाहून ते आणि त्यांचे सर्व मित्र रडू लागले. त्यांनी ही परीक्षा 454 व्या क्रमांकाने पास केली असून, त्यांना आयपीएस अधिकारी होण्याची संधी मिळाली आहे. बजरंग यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना आयएएस अधिकारी बनून गरीब आणि असहाय लोकांना मदत करायची आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना समजले की, केवळ एक मजबूत अधिकारीच गरीब व्यक्तीला मदत करू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com