करिअरनामा ऑनलाईन । ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्या अतिरिक्त (UPSC Success Story) मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या IAS मेधा रुपम यांना कासगंजचे डीएम (DM) बनवण्यात आले आहे; तर त्यांचे पती आयएएस मनीष बन्सल यांच्यावर सहारनपूरच्या डीएमची जबादरी सोपवण्यात आली आहे. IAS मेधा रुपम (IAS Medha Roopam) यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2014 मध्ये संपूर्ण भारतातून 10 वा क्रमांक मिळवला होता. आता मेधा रूपम कासगंजची धुरा सांभाळणार आहेत. मेधा यांना लहानपणापासून शूटिंगची आवड आहे. त्यांनी यामध्ये नॅशनल चॅम्पियनशिप देखील मिळवली आहे. पण UPSC च्या तयारीसाठी त्या शूटिंग पासून दूर राहिल्या. आज आपण त्यांच्या UPSC प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
संपूर्ण देशात मिळवली 10 वी रँक (UPSC Success Story)
IAS अधिकारी मेधा रूपम यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला आहे. मेधा रुपम यांनी केरळमधील एर्नाकुलम येथील नेव्हल पब्लिक स्कूलमध्ये आठवीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी तिरुअनंतपुरमच्या सेंट थॉमस स्कूलमधून 12वीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर पदवी शिक्षणासाठी आपल्या कुटुंबासह त्या दिल्ली येथे गेल्या. मेधा रूपम यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात विषयात पदवी पूर्ण केली आहे. यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2014 मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी संपूर्ण देशात 10 वा क्रमांक पटकावला; यामुळे त्यांना IAS पद मिळाले आहे.
वडील निवडणूक आयुक्त तर पती आहेत IAS
आयएएस मेधा यांचे वडील ज्ञानेश गुप्ता केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत; जे सध्या भारताचे निवडणूक आयुक्त आहेत. मेधा यांचे लग्न आयएएस अधिकारी मनीष बन्सल यांच्याशी झाले आहे. सध्या त्यांना सहारनपूरचे DM बनवण्यात आले आहे.
नेमबाजीत पटकावले गोल्ड मेडल
मेधा यांना 12वीत असताना तिला शूटिंगची आवड निर्माण (UPSC Success Story) झाली. त्यांनी या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवण्यासाठी बराच सराव केला. यानंतर त्यांनी 10 मीटर एअर रायफल पीपी दृष्टीचे प्रशिक्षण घेतले आणि केरळ राज्य नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला. इथे त्यांनी तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. मेधाने विद्यापीठ स्तरावरील नेमबाजी स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. 2009 मध्ये त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देखील भाग घेतला होता; पण नंतर यूपीएससीच्या तयारीसाठी त्या शूटिंगपासून दूर राहिल्या. कसून अभ्यास करून त्यांनी 2014 च्या UPSC परीक्षेत टॉप केले आणि त्यांनी IAS पदासाठी निवड झाली. त्यांची पहिली पोस्टिंग मेरठ, यूपी येथे जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून झाली होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com