करिअरनामा ऑनलाईन । UPSC परिक्षेत पास होण्यासाठी जीव तोडून मेहनत (UPSC Success Story) करावी लागते. यासाठी अनेक उमेदवार अभ्यास करताना अडथळा येवू नये म्हणून आपले छंद मागे सोडतात. पण काहीजण असेही असतात जे आपले छंद जोपासत असतानाच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत सहज पोहचून दाखवतात आज आपण अशाच एका महिला IAS अधिकाऱ्याचा यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. ज्यांचं नांव आहे IAS कविता रामू…
4 थ्या वर्षापासून गिरवले नृत्याचे धडे (UPSC Success Story)
IAS कविता रामू या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. त्यांनी 600 हून अधिक शोमध्ये सोलो परफॉर्मन्स दिला आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांनी नृत्याचे व्यावसायिक प्रशिक्षण घेणे सुरू केले. हे सर्व असूनही त्यांनी आपल्या ध्येयापासून कधीही विचलित न होता आपला अभ्यास चालूच ठेवला. छंद आणि अभ्यास यामध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही.
वडील IAS तर आई प्रोफेसर
IAS कविता रामू यांचा जन्म मदुराई, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील एम. रामू हे देखील आयएएस अधिकारी होते. तर त्यांच्या आई मणिमेगाली लग्नापूर्वी (UPSC Success Story) अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. कविता यांच्या पालकांनी त्यांना अभ्यासासोबतच कलेची आवड निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांची आई – वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्या उत्तम कामगिरी करू शकल्या आहेत.
कविता रामू यांनी वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षापासून नृत्य शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी गुरु नीला यांच्याकडून भरतनाट्यमचे मूलभूत शिक्षण घेतले. मग लवकरच नृत्य त्याची आवड बनली. आयएएस कविता रामू या काही नागरी सेवा अधिकार्यांपैकी एक आहेत ज्यांनी स्वतःला कलेसाठी देखील समर्पित केले आहे.
600 पेक्षा जास्त सोलो परफॉर्मन्स
IAS कविता रामू यांनी आतापर्यंत 600 हून अधिक सोलो स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत. 1981 मध्ये वयाच्या 8 व्या वर्षी त्यांना पाचव्या जागतिक तमिळ परिषदेत त्यांना नृत्य सादरीकरण करण्याची संधी मिळाली. झाकीर हुसेन यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे घेतले आहेत. सनदी (UPSC Success Story) अधिकारी असल्याने कविता यांच्या वडिलांची काही वर्षांच्या अंतराने बदली व्हायची. कविता 10 वर्षांच्या असताना त्यांच्या वदिलंनची चेन्नईला बदली झाली होती. त्यामुळे आयएएस कविता रामू यांचे सुरुवातीचे शिक्षण तामिळनाडूच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पूर्ण झाले आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. वडिलांच्या प्रेरणेने कविता यांनी पदवीचे शिक्षण घेत असताना UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी लोक प्रशासनात एम.ए. ची पदवी मिळवली. त्या कॉलेजमध्ये टॉपर ठरत होत्या.
IAS व्हायचंच होतं (UPSC Success Story)
IAS कविता रामू यांनी 1999 साली तामिळनाडू राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. पण UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी होण्याचे त्यांचे मुख्य ध्येय होते. भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवताना UPSC परीक्षेची तयारीही केली. 2002 मध्ये त्यांना (UPSC Success Story) त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्यावेळी, यूएसए आणि कॅनडामध्ये त्यांच्या कामगिरीशिवाय, त्या IAS अधिकारी देखील बनल्या. त्यांचा प्रवास आजच्या तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com