UPSC Success Story : शाळेसाठी रोजचा 70 की.मी.चा प्रवास; अनेकवेळा हरला पण थांबला नाही; चहा विकणारा तरुण असा बनला IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण अशा एका तरुणाची यशोगाथा (UPSC Success Story) पाहणार आहोत जो तरुण अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करुन अधिकारी बनला आहे. ही कथा आहे उत्तराखंडमधील हिमांशू गुप्ता यांची. करिअर घडवताना यांचा खडतर प्रवास कसा होता याची माहिती आपण घेणार आहोत. चहा विक्रीचा व्यवसाय करुन ते आधी IPS आणि नंतर IAS झाले आहेत.

वडिलांनी मुलांचं शिक्षण बंद पडू दिलं नाही
हिमांशू (IAS Himanshu Gupta) यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. त्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज 70 कि. मी. प्रवास कारावा लागत होता. एवढेच नाही तर वडिलांना हातभार लावण्यासाठी त्यांनी चहाच्या दुकानात कामही केले होते. शाळा, काम. अभ्यास अशी तारेवरची कसरत सुरु असताना त्यांनी परिस्थितीपुढे कधीच हार मानली नाही. हिमांशू आपल्या मेहनतीच्या बळावर UPSC परीक्षा पास झाले आहेत. आज ते IAS अधिकारी बनले आहेत. हिमांशू गुप्ता यांचे वडील रोजंदारीवर काम करायचे. तसेच जास्तीचे पैसे मिळवण्यासाठी ते चहा देखील विकत होते. तरीही त्यांनी आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवण्यासाठी कशाचीही कमी पडू दिली नाही.

चहाच्या दुकानात वडिलांना केली मदत (UPSC Success Story)
घरापासून हिमांशू यांची शाळा 35 किमी अंतरावर होती. त्यामुळे दररोज शाळेत येण्या-जाण्याचे अंतर 70 किमी एवढे होते. हिमांशू शाळेत जाण्यापूर्वी काही वेळ वडिलांसोबत चहाच्या दुकानावर काम करायचे. घरखर्च चालवण्यासाठी हिमांशू आणि त्यांचे वडील दोघे मिळून दिवसाला 400 रुपये कमवायचे. त्यांचे वर्गमित्र त्यांना ‘चायवाला’ म्हणून हिणवायचे. पण त्यांनी याकडे लक्ष देण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

इंग्रजी शिकण्यासाठी DVD विकत घेतल्या
हिमांशू सांगतात; “माझी स्वप्ने मोठी होती. मी शहरात राहण्याचे आणि माझे आणि माझ्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले होते. स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर अभ्यास (UPSC Success Story) कर असे वडील सांगायचे. जर मी कठोर अभ्यास केला तर मला प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळणार होता. पण मला इंग्रजी येत नव्हते, म्हणून मी इंग्रजी चित्रपटांच्या डीव्हीडी विकत घ्यायचो आणि शिकण्यासाठी त्या बघायचो. मी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आणि मला हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.”

कुटुंबासाठी परदेशातील शिक्षणाची संधी नाकारली
“माझ्यामध्ये शिकण्याची भूक मोठी होती. मी माझ्या शिक्षणाचा खर्च पालकांवर लादला नाही. मी माझ्या कुटुंबात पदवीधर होणारा पहिला व्यक्ती आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण करताना (UPSC Success Story) मी माझ्या विद्यापीठात अव्वल आलो होतो. त्यामुळं मला परदेशात पीएचडी (PHD) करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पण मी ती शिष्यवृत्ती नाकारली. कारण मी माझ्या कुटुंबापासून लांब राहू शकत नव्हतो. हा माझा सर्वात कठीण निर्णय होता; पण मी देशातच राहिलो आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला.”

अनेक अपयशानंतर मिळवलं यश
सुरुवातीला हिमांशू गुप्ता यांनी UPSC चा अभ्यास करण्यासाठी (UPSC Success Story) कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास लावला नाही. UPSCच्या पहिल्या प्रयत्नात ते अयशस्वी झाले. परंतू, आयएएस अधिकारी बनण्याचा त्यांनी चंग बांधला होता. त्यांनी दुप्पट मेहनत केली आणि परीक्षेसाठी आणखी 3 प्रयत्न केले. अखेर चौथ्या प्रयत्नात ते आयएएस (IAS) अधिकारी झाले.

IRTS, IPS अन् नंतर झाले IAS (UPSC Success Story)
हिमांशू (IAS Himanshu Gupta) यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा पास केली; तेव्हा त्यांची भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) साठी निवड झाली. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलिस सेवेसाठी म्हणजेच IPS पदावर त्यांची निवड झाली. यावर ते समाधानी नव्हते. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत IAS अधिकारी म्हणून निवड झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com