UPSC Success Story : याच्या खोड्यांना सगळेच वैतागले होते; पण हाच मुलगा आज आहे IAS अधिकारी; दिला यशाचा कानमंत्र

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणी अतिशय खोडकर असलेला (UPSC Success Story) मुलगा मोठा होऊन IAS अधिकारी होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. कारण तो इतका खोडकर होता की, शिक्षक घरी येऊन त्याच्या पालकांकडे तक्रार करायचे. तो आयुष्यात कधीच प्रगती करु शकणार नाही असं सर्वांनी गृहीत धरलं होतं. आज आपण जाणून घेणार आहोत तरुण IAS अधिकारी आदित्य पांडे (IAS Aaditya Pandey) यांच्याबद्दल.

ही कथा बिहारची राजधानी पाटणा येथील बिशुनपूर पाकडी या गावात राहणाऱ्या एका मुलाची आहे. हा मुलगा इतर मुलांप्रमाणेच किंबहुना त्यांच्यापेक्षा थोडा जास्तच खोडकर होता. पण हाच खोडकर मुलगा पुढे जावून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला आणि आयएएस (IAS) अधिकारी बनला आहे. हा क्षण त्याला ओळखणाऱ्यांपैकी अनेकांसाठी धक्कादायक होता. त्याच्या खोडसाळपणाच्या कथा गावभर प्रसिद्ध होत्या. त्याचे शिक्षक घरी येवून तक्रारींचा पाढा वाचत असत.

…तर मी माझ्या मिशा काढेन (UPSC Success Story)
स्वतः आदित्य पांडेला त्याच्या लहानपणीचे खोडसाळपणाचे किस्से आठवतात. तो सांगतो; “एकदा माझ्या शिक्षिकेने वडिलांकडे तक्रार केली आणि म्हणाले, जर आदित्य त्याच्या अभ्यासात गंभीर झाला तर मी माझ्या मिशा काढून टाकेन. हा प्रसंग आठवल्यानंतर मला आजही खूप हसू येते.” यावरून तुम्हाला त्याच्या बालपणीच्या दिवसांची कल्पना येऊ शकते. त्यानंतर आदित्यने खूप मेहनत करायचे ठरवले. त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि आधी तो इंजिनीअर झाला आणि नंतर त्याने एमबीएची पदवी घेतली. यावर त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली आणि अखेरीस तो आयएएस अधिकारी झाला.

उच्च शिक्षित आहे आदित्य
12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर आदित्य पांडेने पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून B. Tech केले. त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. त्यानंतर आदित्य पांडेने (UPSC Success Story) आयआयटी रुरकीमधून एमबीए केले. दोन वर्षे एका खाजगी बँकेत काम केल्यानंतर 2020 मध्ये UPSC परीक्षेच्या तयारीसाठी त्याने नोकरी सोडली. आयआयटी रुरकी येथील नोकरशहाशी बोलल्यानंतर त्याने नागरी सेवांमध्ये रुजू होण्याची योजना आखली. सलग दोन वेळा तो UPSC परीक्षा नापास झाला होता. मात्र त्याने पराभव स्वीकारला नाही.

किमान 84 प्रश्न सोडवलेच पाहिजेत
दोनवेळा अपयश आले तरी न हारता कठोर मेहनत घेवून आदित्यने 2022 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत यश संपादन केले आहे. UPSC CSE 2022 मध्ये ऑल इंडिया रँक 48 मिळवून तो IAS अधिकारी बनला आहे. त्याला झारखंड केडर देण्यात आले. सध्या तो झारखंडची राजधानी रांचीमध्ये असिस्टंट कलेक्टर पदावर आहे. नागरी सेवा परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात तो फक्त 2.5 गुणांनी कटऑफ लिस्ट चुकला. म्हणून तो UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना सल्ला देतो की UPSC इच्छुकांनी परीक्षेत किमान 84 प्रश्न सोडवले पाहिजेत.

अशी करा मुलाखतीची तयारी (UPSC Success Story)
आदित्य म्हणतो की UPSC मुलाखतीची तयारी करणाऱ्या इच्छुकांनी त्यांचा DAF अतिशय काळजीपूर्वक वाचावा कारण UPSC मुलाखतीत DAF कडून प्रश्न नक्कीच विचारले जातात. त्याच्या DAF मध्ये त्याने रामचरितमानस ऐकल्याबद्दल आणि कोरियन नाटक आवडल्याबद्दल सांगितले होते. मुलाखती दरम्यान आदित्यला या दोघांशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर कोरियासोबतच्या चर्चेतून रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. पुढे तो सांगतो की UPSC मॉक इंटरव्ह्यू या प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा खूप वेगळ्या असतात. एवढेच नाही तर यूट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंवरही जास्त विश्वास ठेवू नये; असा सल्ला तो उमेदवारांना आवर्जून देतो.

यूपीएससीच्या मुलाखतीपूर्वी अनेकांनी आदित्य पांडेला सावध केले होते. लोकांचा असा विश्वास होता की त्याच्या वृत्तीमुळे तो मुलाखतीत नापास होवू शकतो. पण आदित्य पांडेने आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वावर खोटे आवरण घातले नाही. यूपीएससीच्या मुलाखतीत तो जसा आहे तसाच दिसला. यावेळी काही मार्गदर्शकांनीही त्याला साथ दिली. आदित्य पांडे म्हणतो की, मुलाखतीदरम्यान तुम्ही मूळ जसे आहात तसे राहा. कारण UPSC मुलाखत घेणाऱ्या पॅनेलमध्ये 50 ते 60 वयोगटातील 5 तज्ञ आपल्या समोर बसलेले असतात. ते त्यांच्या अनुभवाच्या आधारे उमेदवाराचे खरे आणि खोटे रूप सहज ओळखू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com