UPSC Recruitment 2024 : UPSC ने जाहीर केली ‘या’ पदावर भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Recruitment 2024) नवीन भरती जाहीर केली आहे. या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती मोहिमेद्वारे विविध पदांच्या एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे २०२४ आहे. पाहूया आवश्यक पात्रता, रिक्त जागांचा तपशील आणि भरती प्रक्रिया…

आयोग – केंद्रीय लोकसेवा आयोग
भरली जाणारी पदे – वैज्ञानिक-बी (नॉनडिस्ट्रक्टिव्ह), सहाय्यक प्राध्यापक (नेफ्रोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (न्यूक्लियर मेडिसिन), सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग हृदयविज्ञान), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग शस्त्रक्रिया), सहायक प्राध्यापक (प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया), सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक (सर्जिकल ऑन्कोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (युरोलॉजी), संशोधन अधिकारी (रसायनशास्त्र), वैज्ञानिक ‘बी’ (रसायनशास्त्र), वैज्ञानिक ‘बी’ (भौतिकशास्त्र), अन्वेषक ग्रेड-I, सहायक रसायनशास्त्रज्ञ, उपमहासंचालक (तांत्रिक), सहायक प्राध्यापक (बीबीए), सहायक प्राध्यापक (वाणिज्य सामान्य), सहायक प्राध्यापक (कॉर्पोरेट सचिवपद), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (इंग्रजी), सहायक प्राध्यापक (हिंदी), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहाय्यक प्राध्यापक (समाजशास्त्र), वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद)
पद संख्या – 109 पदे (UPSC Recruitment 2024)

भरतीचा तपशील –
1. शास्त्रज्ञ-ब – 3 पदे
2. स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक – ४२ पदे
3. अन्वेषक ग्रेड-I – २ पदे
4. असिस्टंट केमिस्ट – ३ पदे
5. नॉटिकल सर्व्हेअर-कम डेप्युटी डायरेक्टर जनरल – ६ पदे
6. सहाय्यक प्राध्यापक – २३ पदे (UPSC Recruitment 2024)
7. वैद्यकीय अधिकारी – ४० पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2024
वय मर्यादा – 50 वर्षे

असा करा अर्ज – (UPSC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://upsconline.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com