UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन ब-हाटे

स्पर्धापरिक्षांची तयारी करावी आणि शासकीय सेवेत सिलेक्ट व्हावे अशी अनेकांची इच्छा असते परंतु नेमकी तयारी कधी सुरू करावी याबद्दल स्पष्टता नसते. हा अभ्यास कधी सुरू करावा याची माहिती स्पर्धापरिक्षा लेखमालेच्या या दुसर्या लेखात घेऊ. स्पर्धापरिक्षांचा द्यायच्या आहेत असा ठाम निर्धार झाला कि,

१.स्वत:च्या क्षमता आणि कमतरता , 
२. UPSC/MPSC आयोगाच्या अपेक्षा 
३. अधिकारी होण्यासाठी लागणारी प्रवृत्ती आणि कल

इत्यादी गोष्टींचे बारकाईने विश्लेषण करावे. त्यातील अंतर आणि मेहनतीची आवश्यकता लक्षात आली की लगेच अभ्यास सुरू करावा. “अर्ली बर्ड, रीचेस अर्ली” या उक्तीप्रमाणे ‌जेवढ्या लवकर अभ्यास सुरू कराल तेवढ्या लवकर यशोशिखर गाठाल.

) १० वी नंतर – हा टप्पा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खुप लवकर होतो, या टप्प्यावर स्पर्धापरिक्षांची तोंडओळख करुन घेता येईल त्यानुसार विस्तृत वाचनाची सवय लावणे, स्वतःच्या सवयींवर काम करणे, भोवताल आणि स्व: समजुन घेणे इत्यादी गोष्टी करता येतील. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्याला काय आवडते आणि काय चांगले जमेल याचा शोध घेऊन आपला सक्षम शैक्षणिक आलेख तयार करणे अपेक्षित आहे

) १२ वी नंतर – स्पर्धापरिक्षाच्या अभ्यासाची सुरुवात करण्याचा हा सर्वात उत्तम काळ आहे. ज्यात पदवी मिळताना तुमच्याकडे पोस्ट असण्याची संधी आहे. बारावी नंतर अभ्यास सुरू केल्यावर आपणास 3/4 वर्ष मिळतात परिक्षा न देता फक्त अभ्यास करता येतो(पदवी अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता). हे 3/4 वर्षे रणनीती आखुन नियोजनबद्ध अभ्यास पुर्ण करता येतो .सामान्य अध्ययनातील सर्व संकल्पना समजुन घेणे. या पहिल्या ते तिसर्या वर्षांपर्यंत अनुक्रमे बेसिक, NCERTs आॅप्शनल/‌HRD, निबंध,Ethics , मेन्स, प्रिलिम असा सर्वांंगीण आणि संपुर्ण अभ्यास करता येतो .स्वत:च्या विकासावर लक्ष देता येते तसेच आपापल्या क्षेत्रात आपण तज्ज्ञ होणेही येथे अपेक्षित आहे.

) पदवीच्या शेवटच्या वर्षाला- हा अभ्यास आव्हानात्मक असतो. पदवीला उत्तम मार्क्स मिळवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असतो. या स्टेज वर दोन्ही आघाड्यांवर लढत रहावे लागते, अभ्यासाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

) पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर – सर्वाधिक परिक्षार्थी या स्टेजवर अभ्यास करतात. घरची आर्थिक परिस्थिती ठिक असल्यास पुर्ण वेळ अभ्यास करता येतो . पण तो कमी वेळेत ,अधिक वेगात समान आक्रमकतेने पुर्ण करावयाचा असतो . कारण या स्टेज वर लवकरात लवकर आपलं करिअर सेट करण समाजाकडुन अपेक्षित असतं. हा पुर्ण वेळ वापरुन सुरवातीच्या काही प्रयत्नातंच पोस्ट मिळवुन घ्यावी.

) नोकरी करुन – नोकरी करूनही पोस्ट मिळवता येते पण त्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, मानसिक स्थैर्य आवश्यक असते कारण या स्टेज वर आपली स्पर्धा पुर्ण वेळ अभ्यास करणार्यांशी असते .आपण उत्कृष्ट विश्लेषक आणि निरीक्षक असणे आवश्यक आहे.

UPSC/MPSC आयोगाला वर्षोनवर्षे पुस्तकात डोकं घालून बसणार्या परिक्षार्थीं ऐवजी कमी वेळेत अधिकाधिक आकलन कौशल्ये असणारी तसेच, कामामध्ये नाविन्य शोधणारे चिकित्सक अष्टपैलू परिक्षार्थी अपेक्षित आहेत. ही अपेक्षा पूर्ण केलीत तर मग तुम्ही पदवी दरम्यानच्या कोणत्याही वर्षी तयारी केली तरी निश्र्चित यश मिळवता.

या अभ्यासप्रवासात प्रामाणिक मार्गदर्शक असणे अपरिहार्य आहे कारण, कुठे पोहचायचे हे जरी माहित असले तरी कसे पोहचायचे हे अनुभवी मार्गदर्शकच सांगु शकतो. स्पर्धा परीक्षा ही प्रचंड स्पर्धात्मक असल्याने योग्य दिशा आणि अभ्यास याशिवाय पद मिळविणे अशक्य आहे. सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य दिशेने नियोजन असेल तर वरील पैकी कोणत्याही स्टेज वरील परिक्षार्थी UPSC/MPSC मधुन क्लास वन पदवी मिळवु शकतो.

Something don’t just happen,they happen because somebody decided to make them happen

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक ‘लोकनिती IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)