करिअरनामा ऑनलाईन । राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या (UPSC Free Coaching) विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये राहून कोचिंग क्लासेसच्या मदतीने अभ्यास करत असतात. मोठ्या शहरात राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च सर्वच विद्यार्थी आणि पालकांना परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मोफत निवासी प्रशिक्षण आणि निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2025 च्या निशुल्क परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करण्यात आली आहे. या संधीचा फायदा करून घेण्यासाठी इथे दिलेली सविस्तर माहिती वाचा…
या तारखेपर्यंत करता येणार अर्ज –
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2025 करिता निशुल्क परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना दि. 28 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे
या तारखेला होणार प्रवेश परीक्षा – (UPSC Free Coaching)
यासाठीची सामायिक लेखी परीक्षा 4 ऑगस्ट 2024 ला होणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईच्या संचालिका डॉ. स्वाती वाव्हळ यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
येथे होणार सामायिक प्रवेश परीक्षा –
यूपीएससी परीक्षा 2025 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय पूर्व (UPSC Free Coaching) प्रशिक्षण केंद्र नाशिक, औरंगाबाद तसेच कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
इथे करा अर्ज –
संस्थेने याकरिता जी जाहिरात दिलेली आहे त्यातील नमूद अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून https://www.siac.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत.
महत्त्वाच्या तारखा – (UPSC Free Coaching)
1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 28 जून 2024.
2. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024.
3. लेखी प्रवेश परीक्षेची तारीख – 4 ऑगस्ट 2024 आहे.
प्रवेश निश्चित करण्याचे निकष असे आहेत –
– यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकूण गुणांच्या आधारे ठरवले जाणार आहेत.
– परीक्षा झाल्यानंतर याकरिता असलेल्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
– सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जेव्हा जाहीर होईल त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून आवडीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडायचे आहे.
– महत्त्वाचे म्हणजे प्रवेश प्रक्रियेबाबत असलेली कोणतीही महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. (UPSC Free Coaching)
– प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच याची सविस्तर जाहिरात तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम व पात्रता तसेच ऑनलाइन अर्ज कसा भरावा यासंबंधीच्या सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com