UPSC ESE Mains 2023 : UPSC मेन्सची तारीख जाहीर; कधी होणार परीक्षा?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC ESE Mains 2023) इंजिनीअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनच्या मेन्स 2023 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षा 25 जून 2023 रोजी घेतली जाईल आणि ती दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी परीक्षा दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान होईल. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलं आहे.
327 जागा भरणार
ESE प्रीलिम्स 2023 उत्तीर्ण झालेले उमेदवार मेन्स परीक्षेला बसण्यास पात्र असतील. परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड्स लवकरच UPSCच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. यूपीएससी इंजिनीअरिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट 2023 अंतर्गत विविध इंजिनीअरिंग (UPSC ESE Mains 2023) विभागांमध्ये 327 रिक्त जागा भरण्यासाठी सरकारकडून आयोजित केली जात आहे. भरती प्रक्रियेमध्ये प्रीलिम्स परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि पर्सनॅलिटी टेस्टचा समावेश असतो.

निवड प्रक्रिया (UPSC ESE Mains 2023)
मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पर्सनॅलिटी टेस्टसाठी बोलावले जाईल, ही निवड प्रक्रियेची अंतिम फेरी असेल. पर्सनॅलिटी टेस्ट उमेदवाराची लीडरशिप स्कील्स, कम्युनिकेशन स्क्रील्स व एकूण व्यक्तिमत्व गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी घेतली जाते.
ईएसई परीक्षा ही भारतातील इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्ससाठी सर्वात प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. ही विविध सरकारी विभागांमध्ये काम करण्याची आणि देशाच्या (UPSC ESE Mains 2023) पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची संधी देते.
ईएसई मेन 2023 परीक्षेची तयारी करत असलेले इच्छुक उमेदवार अभ्यासाचे योग्य नियोजन आणि समर्पणातून परीक्षा उत्तीर्ण करू शकतात आणि सरकारी इंजिनीअरिंग विभागात काम करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. UPSC ESE Mains 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली असल्याने उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड्स व परीक्षेच्या वेळापत्रकाशी संबंधित अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Exam Notice डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-

  • वेब ब्राउझर उघडा आणि UPSC ची ऑफिशिअल वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
  • होम पेजवर टॉप मेन्यूमधील ‘Examination’ टॅबवर क्लिक करा.
  • ड्रॉप-डाउन मेनूमधून, ‘Active Examinations’ निवडा आणि नंतर तुम्हाला ज्या परीक्षेची नोटीस डाउनलोड करायची आहे त्या नावावर क्लिक करा. (UPSC ESE Mains 2023)
  • एक्झाम पेजवर ‘नोटीस’ सेक्शन शोधा आणि नोटीस डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • नोटीस तुमच्या डिव्हाइसवर PDF स्वरूपात डाउनलोड केली जाईल. तुम्ही PDF रीडर वापरून ते उघडू आणि पाहू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com