करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल (मंगळवारी) जाहिर झाला आहे. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी घवघवीत यश मिळवले आहे. आजरा तालुक्यातील उत्तुरच्या वृषाली कांबळे, शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावचे आशिष पाटील तर कोल्हापुरातील फरहान इरफान जमादार यांनी लोकसेवा परीक्षेत कोल्हापूरचे नाव उंचावले आहे.
वयाच्या 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारी वृषाली
आजरा तालुक्यातील उत्तूर येथील वृषाली संतराम कांबळे हिने देशभरात ३१० वी रॅंक घेऊन युपीएससी परिक्षेत उज्वल यश मिळवले आहे. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी (UPSC CSE Result 2023) आणि पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश संपादन केले आहे. वृषालीने राज्यशास्त्र विषय घेऊन बी.ए. पूर्ण केले आहे. मुंबई येथील सेंट झिविअर्स कॉलेज येथे तिचे शिक्षण झाले आहे. वृषालीचे मूळ गाव उत्तूर असून त्यांचे वडिल कामानिमित्त नेरूर येथे राहतात.
आशिष पाटीलने तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश (UPSC CSE Result 2023)
शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावचा तरुण आशिष पाटील यांनी १४७ व्या रँकने आयएएस पद प्राप्त केले आहे. त्याने UPSC च्या तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे. तो सध्या दिल्ली, दिव- दमन या केंद्रशासित प्रदेशात उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होता. यापूर्वी त्यांनी २०२२ मध्ये ४६३ तर २०२१ मध्ये ५६३ व्या रँक मिळवली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण भारतातून १४७ वी रँक मिळवली आहे.
फरहान जमादार ने मिळवली १९१ वी रँक
कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील फरहान (UPSC CSE Result 2023) जमादार याने १९१ वी रँक मिळवत UPSC मध्ये मोठं यश मिळलं आहे. त्याचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण कदमवाडी येथील सुसंस्कार हायस्कूल येथे झाले. विवेकानंद कॉलेजमध्ये बारावी तर सांगलीतील वालचंद कॉलेजमधून कॉम्यूटर सायन्समधून इंजिनिअरची पदवी घेतली आहे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com