Unique Career : ‘फॅशन लॉ’ म्हणजे काय? कसं घ्यायचं शिक्षण? जाणून घ्या यामधील करिअरच्या संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। आजकाल प्रत्येकाला जगापेक्षा वेगळं काहीतरी करिअर करण्याची इच्छा असते. म्हणूनच (Unique Career) नेहमीच विद्यार्थी ग्रॅज्युएशननंतर वेगळं करिअर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना लॉ करायचं असतं पण तेच तेच कोर्टाच्या फेऱ्या मारणारे वकील बनायचं नसतं. म्हणूनच तुम्हीही कायद्याचे शिक्षण घेत असाल आणि या क्षेत्रात काही वेगळे करायचे असेल, तर तुम्ही फॅशन लॉ करून पाहू शकता. फॅशन लॉमध्ये केवळ उज्ज्वल करिअरचा वावच नाही तर पैसे कमावण्याची चांगली संधीही मिळते. फॅशन लॉ म्हणजे काय आणि त्यामध्ये भविष्य कसे उज्ज्वल करता येईल हे जाणून घेऊया.

काय आहे फॅशन कायदा?

जर तुम्ही फॅशनशी निगडीत असाल, तर तुम्हाला आधीच माहित असेल की फॅशन आणि लक्झरी क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या, ज्या आता ब्रँड बनल्या आहेत, त्या ट्रेडमार्कच्या संरक्षणासाठी वकील ठेवतात. मोठ्या कंपन्या (Unique Career) बौद्धिक संपदा हक्क, कॉपी उत्पादने आणि बरेच काही यासारख्या कायदेशीर लढाईसाठी वकील भाड्याने घेतात. याशिवाय मोठमोठे फॅशन डिझायनर, फोटोग्राफर आणि अनेक बडे स्टार्स त्यांच्या हक्कांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी वकील ठेवतात. अशा परिस्थितीत फॅशन लॉमध्ये स्पेशलायझेशन करून उज्ज्वल आणि उत्तम करिअर करता येईल.

फॅशन लॉसाठी पात्रता काय आहे?

फॅशन लॉमध्ये करिअरची योजना आखणाऱ्या उमेदवारांना कायद्याव्यतिरिक्त कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. फॅशन वकील होण्यासाठी, तुमच्याकडे नियमित कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे. मात्र, काळानुरूप फॅशन लॉची वाढती मागणी पाहता आज अनेक खासगी संस्था त्यासाठी अभ्यासक्रम चालवत आहेत. काही खाजगी संस्था फॅशन लॉमध्ये पदवी आणि पदविका अभ्यासक्रम देखील देतात.

फॅशन लॉ मध्ये करिअरच्या संधी (Unique Career)

भारतातील वाढत्या कापड उद्योगामुळे फॅशन लॉ मध्ये शिक्षण घेतलेल्या वकिलांची गरज झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या फॅशन कायद्यात तज्ञ असलेल्या उमेदवारांना कामावर घेतात. यासोबतच (Unique Career) ते सरकारी वकील म्हणूनही काम करू शकतात. फॅशन लॉमध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर तुम्ही महिन्याला 2 ते 3 लाख रुपये कमवू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com