UGC NET Result 2024 : UGC NET चा निकाल पुढे ढकलला; ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात (UGC NET Result 2024) आलेल्या नेट परीक्षेचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. चेन्नई व आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने आता श्रव निकाल दि. 17 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक एनटीएने प्रसिद्ध केले आहे.

एनटीएतर्फे (NTA) देशभरातील 292 शहरांमध्ये 6 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत नेट (NET) परीक्षा घेण्यात आली. 9 लाख 45 हजार 918 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. एनटीए तर्फे 10 जानेवारी रोजी नेट परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. परंतु काही (UGC NET Result 2024) कारणास्तव निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मिचौंग वादळामुळे चेन्नई व आंध्र प्रदेशातील उमेदवारांना या परीक्षा देता आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. परिणामी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यानंतर नेट परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे, असे एनटीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com