करिअरनामा ऑनलाईन । भारतामध्ये दिवसेंदिवस विकास (Big News) होत आहे. नवनवीन प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या विकासाला चालना दिली जात आहे. या पार्श्वभूमी वर आता देशातील बारा ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सरकारने मोठी योजना राबवत आहे. 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर दिला आहे. त्यामुळे आता इथून पुढे अनेक नवीन महामार्ग एक्सप्रेस तयार करण्यावर जास्त भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर सरकारने आता 12 नवीन शहरांना ‘औद्योगिक हब’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश आहे.
आपले देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील 12 नवीन औद्योगिक शहरे (Industrial Cities) स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातील आंध्र प्रदेशमध्ये दोन आणि बिहारमध्ये एक आहे. या औद्योगिक शहरांमुळे आता राज्यात रोजगाराची संधी देखील निर्माण होणार आहे; त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे.
12 नवीन शहरांचा समावेश (Big News)
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीला आठ औद्योगिक शहरात पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील. बजेटमध्ये यावर्षी 12 नवीन शहरांचा समावेश देखील केलेला आहे. परंतु येत्या काही दिवसातच या शहरांची संख्या 12 वरुन 20 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या देशात रोजगार निर्मिती होणार आहे; परिणामी इतर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील कमी होणार आहे.
प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करणार
2023 – 24 चा अर्थसंकल्पात उत्पादन वाढवण्यासाठी आणि राज्य तसेच खाजगी क्षेत्राच्या भागीदारीत 100 शहरात प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्याची देखील घोषणा (Big News) करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती राजेश कुमार सिंग यांनी दिली आहे. या आधीच आठ शहरांमध्ये औद्योगिकीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. या चार शहरांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आंध्र प्रदेशमध्ये सुरुवात देखील झालेली आहे. उद्योगासाठी आता जागा वाटपाचे काम देखील सुरू झाले असून त्यामुळे या शहरांमध्ये दळणवळण सुविधा पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधा देखील लवकरात लवकर होणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com