Talathi Bharti Merit List : मोठी बातमी!! तलाठी भरतीची सुधारीत गुणवत्ता यादी प्रसिध्द; इथे आहे जिल्हानिहाय लिंक

करिअरनामा ऑनलाईन ।राज्यात तलाठ्यांची रिक्त पदे (Talathi Bharti Merit List) भरण्यासाठी टीसीएस (TCS) कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा पार पडल्यानंतर परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपांवर केलेल्या कार्यवाहीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन याचिका कर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने 13 फेब्रुवारी रोजी दिला होता.

57 शिफ्टमध्ये झाली परीक्षा
संपूर्ण राज्यात १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये तलाठी भरती परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 57 शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षा झाल्यानंतर टीसीएस कंपनीकडून २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न / उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्यात आले होते. त्यानुसार टीसीएस कंपनीकडून ७९ प्रश्नांमध्ये उत्तरसूची / प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे.

आता प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये / त्यांच्या उत्तर सूचीत (Talathi Bharti Merit List) बदल करण्यात येत आहे. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच १८० प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या login खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या २१९ प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादी मध्ये बदल झाला आहे.

त्यानुसार ३६ जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हा निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे; असे प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे म्हटले आहे.

गुणवत्ता यादी पाहण्यासाठी येथे Click करा – CLICK
तलाठी भरतीची जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी – (Talathi Bharti Merit List)

अनु क्र.जिल्हासुधारित गुणवत्ता यादीची लिंक
1अकोलाClick
2अमरावतीClick
3यवतमाळClick
4वाशिमClick
5गडचिरोलीClick
6नागपूरClick
7धुळेClick
8गोंदियाClick
9नाशिकClick
10अहमदनगरClick
11नांदेडClick
12नंदुरबारClick
13पालघरClick
14पुणेClick
15बीडClick
16बुलढाणाClick
17भंडाराClick
18रायगडClick
19मुंबईClick
20मुंबई उपनगरClick
21कोल्हापूरClick
22रत्नागिरीClick
23लातूरClick
24वर्धाClick
25साताराClick
26सांगलीClick
27सिंधुदुर्गClick
28सोलापूरClick
29हिंगोलीClick
30परभणीClick
31छत्रपती संभाजीनगरClick
32चंद्रपूरClick
33जळगांवClick
34जालनाClick
35धाराशिवClick
36ठाणेClick
37राखीव निकाल यादी 1Click
38राखीव निकाल यादी 2Click

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com