दहावी बारावीच्या निकालाची तारिख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत
देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाउन होण्याआधीच दहावी आणि बारावीची परीक्षा झाली होती तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. निकाल लागण्याचा कालावधी निघून गेल्यामुळे निकालाबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर निकालाबाबतच्या चर्चेला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला.