Swiggy Recruitment 2022 : स्विगीसोबत काम करण्याची संधी!! बॅचलर डिग्री असेल तर लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। लोकप्रिय रेस्टॉरंट टेक्नॉलॉजी आणि डायनिंग प्लॅटफॉर्म डायनआउट विकत (Swiggy Recruitment 2022) घेतल्यानंतर, स्विगी आपली टीम वाढवत आहे. स्विगीने आता सॉफ्टवेअर अभियंता, क्लस्टर मॅनेजर या पदांवर भरती जाहिर केली आहे. स्विगी कंपनी देशातील अनेक शहरांमध्ये या पदांवर भरती करणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीच्या माध्यमातून अकाउंट्स मॅनेजर-रिटेल (Accounts Manager-Retail) आणि अकाउंट्स मॅनेजर-प्रिमियम (Accounts Manager-Premium) ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

कंपनी – स्विगी

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

भरली जाणारी पदे –

 1. अकाउंट्स मॅनेजर-रिटेल (Accounts Manager-Retail)
 2. अकाउंट्स मॅनेजर-प्रिमियम (Accounts Manager-Premium)
 • अकाउंट्स मॅनेजर-रिटेल (Accounts Manager-Retail) –

आवश्यक पात्रता – (Swiggy Recruitment 2022)

 • या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.
 • सल्लागार, ई-कॉमर्स किंवा स्टार्ट-अपमध्ये काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा.

कामकाजाचे स्वरूप –

 1. स्विगी-डायनआउटशी संबंधित सर्व रेस्टॉरंट्सचे पोर्टफोलिओ मॅनेज करणं.
 2. इतर स्पर्धक कंपनीच्या योजनांवर लक्ष ठेवणं.
 3. व्यवस्थापनात सुधारणा सुचवणं आणि बैठकांचं आयोजन करणं.
 4. नवीन भरतीसाठी वॉक-इनचं आयोजन करणं; हे अकाउंट्स मॅनेजर-रिटेलचं मुख्य काम असेल.
हे पण वाचा -
1 of 123

(Note – आग्रा, इंदूर, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर, दिल्ली येथे अकाउंट्स मॅनेजर-रिटेल या पदांसाठी भरती सुरू आहे.)

 • एकाउंट्स मॅनेजर-प्रीमियम (Accounts Manager-Premium) –

आवश्यक पात्रता –

 • या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.
 • ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन मार्केटिंग चॅनेलचे ज्ञान असलेले आणि त्यात काम करण्याचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा.
 • या पदावर नियुक्ती करताना व्यवस्थापन पदवी असलेल्यांना प्राधान्य मिळेल.

कामकाजाचे स्वरूप –

 1. खाते व्यवस्थापक-प्रीमियमची मुख्य कामं राष्ट्रीय रेस्टॉरंटची चेन मॅनेज करणं.
 2. शहरातील महत्त्वाच्या ग्राहक रेस्टॉरंटशी उत्तम संबंध निर्माण करणं. (Swiggy Recruitment 2022)
 3. संभाव्य ग्राहकांना तसेच विद्यमान ग्राहकांना नियमितपणे नवीन कल्पना सादर करणं.
 4. नवीन आउटलेटचं प्लानिंग करणं इत्यादी कामे असतील.

(Note – मुंबई, पुणे, चेन्नई आणि बंगलोर येथे खाते व्यवस्थापक-प्रीमियम या पदांसाठी भरती सुरू आहे.)

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://careers.swiggy.com/#/careers

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com