Suryadatta Scholarship : ‘सूर्यदत्त’ची ‘लाइफलाॅंग लर्निंग’ शिष्यवृत्ती!! नोकरदारांसहीत विद्यार्थ्यांना मिळणार 75 लाखांची शिष्यवृत्ती; संधीचा फायदा घ्या

करिअरनामा ऑनलाईन । सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ‘लाइफलाॅंग लर्निंग’ शिष्यवृत्ती (Suryadatta Scholarship) जाहीर करण्यात आली आहे. विविध कंपन्यात कार्यरत नोकरदार, ‘सूर्यदत्त’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, पोलीस, पत्रकार, निवृत्त सैनिक आणि कोरोनामध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील व्यक्ती, पुण्यातील स्वयंसेवी संस्थात राहणारे, अनाथ विद्यार्थी यांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अशा उच्च शिक्षणासाठी लाइफलाॅंग लर्निंग उपक्रमांतर्गत 75 लाखांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याची 75 वर्षे अर्थात आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट आणि सीएसआर इनिशिएटिव्ह द्वारे ‘सर्वांसाठी शिक्षण’ अंतर्गत ही 75 लाखांची (Suryadatta Scholarship) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापीठांशी संलग्नित अर्धवेळ किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा अल्प कालमर्यादेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम शनिवार-रविवार शिकता येतील अशा अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. दहावी, बारावी व पदवीनंतरचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या संदर्भात प्रा. डॉ. चोरडिया यांनी सांगितले की, “यंदा शिष्यवृत्ती योजनेचे अकरावे वर्ष आहे. गेल्या 10 वर्षांत 1300 पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी साडेतीन कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. 200 पेक्षा अधिक कंपन्यांना आपल्या संस्थेतील चांगल्या कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे.”

शिष्यवृत्ती कोणाला दिली जाणार ?

 1. सूर्यदत्त संस्थेत शिकणाऱ्या पालकांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असून, या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
 2. ज्येष्ठ नागरिकांना, तसेच निवृत्त झालेल्या व्यक्तींना बराचसा वेळ शिल्लक असतो. त्यांना काही अभ्यासक्रम शिकता येतील. तसेच त्यांना आपल्या वेळेचा सदुपयोग करता येईल.
 3. पोलीस व पत्रकारांसाठीही काही अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले असून, त्यांना स्वतःला अद्ययावत करण्यासाठी शिक्षण घेता येणार आहे.
 4. गृहिणींना घर सांभाळून शिकता येणारे अनेक अभ्यासक्रम विविध विद्यापीठांच्या मार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
 5. कोरोना काळात ज्यांचे पती किंवा पत्नी मृत पावली असेल, अशा व्यक्तींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
 6. सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांना पुढील शिक्षण घेऊन पुन्हा करिअर करता यावे, यासाठी शिष्यवृती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अशी असेल पात्रता (Suryadatta Scholarship)

 1. विविध कंपन्यांकडून इच्छूक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
 2. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, फॉरेन ट्रेड आदी शाखांमध्ये पीजीडीएमएलएम, पीजीडीएफटी, पीजीडीएमएम, पीजीडीएफएस आदी अभ्यासक्रम शिकता येतील.
 3. प्रोडक्शन मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, लाईन लीडर, सिनिअर इंजिनिअर, हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंजिनिअर, टीम मेम्बर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, डायरेक्टर, पर्चेस ऑफिसर, स्टोअर असिस्टंट, सुपरिंटेंडेंट्स आदी पदांवर काम करणारे यासाठी पात्र असतील.
 4. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार पदवीधारक, तसेच 22 ते 50 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीसाठी असा करा अर्ज?

 1. या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे.
 2. कंपन्यांच्या CEO /HR यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नावे 10 जुलैपर्यंत पाठवावीत. (Suryadatta Scholarship)
 3. तज्ज्ञ समितीकडून आलेल्या अर्जाची छाणनी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 4. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांची अंतिम यादी 10 ऑगस्ट 2022 नंतर जाहीर होईल.

येथे साधा संपर्क – 

 • अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्या.
 • इच्छुकांना आवडीच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक कागदपत्रांसह 8956932415 किंवा 8956932417 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पत्ता –

 1. बावधन परिसर : सर्वेक्षण क्र.342, बावधन, पुणे-411 021
 2. सदाशिव पेठ परिसर : 2074, सदाशिव पेठ, विजयनगर कॉलनी, पुणे – 411030
 3. टिळक रोड परिसर : निखिल प्राइड, टिळक रोड, पुणे – 411 030 या पत्त्यावर संपर्क करू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com