Success Story : वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती; मुलांसाठी पोलीस भरतीचं पाहिलं स्वप्न; अन् चारही भावंडांची पोलीस दलात झाली निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या (Success Story) गावातील अतीशय सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटूंबातील चार मुलांची पुणे शहर व रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. विजय गाडेकर यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण गाडेकर यांचं स्वप्न होतं की आपल्या चारही मुलांनी पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करावी. यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. आज त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आहे. त्यांच्या चारही मुलांची पोलिस दलात नियुक्ती झाली आहे.
यामध्ये सारीका गाडेकर हि सन 2011 साली (Success Story) तर आशा गाडेकर ही 2014 साली व दिपक गाडेकर व अंकीता गाडेकर या दोघांची 2023 साली महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती झाली आहे.

या चारही भावंडांना पहिल्यापासूनच अभ्यासाची गोडी होती. लहानपणापासूनच मनात जिद्द होती की आपण समाजात नावलौकिक मिळवावा. या चारही भावंडांचे शालेय शिक्षण (Success Story) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद येथे तर उच्च शिक्षण बाळासाहेब जाधव महाविद्यालय, आळे या ठिकाणी झाले आहे. त्यांना पोलिस भरतीसाठी सह्याद्री करीअर अकॅडमीचे प्रशिक्षक मयूर डुंबरे, गीताराम गायकर व अनिकेत घोडेकर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध परीक्षा पूर्ण करून चारही भावंडे महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले आहेत. चारही भावंडांनी हे यश मिळवल्याबद्दल संपूर्ण तालुका व वडगाव आनंद ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com