Success Story : या पठ्ठयाने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली JEE; YouTube वरुन घेतलं मार्गदर्शन; IAS होण्याचं आहे स्वप्न

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसापूर्वी जेईई मेनचा (JEE Main) निकाल (Success Story) जाहीर झाला. देवघरचा रहिवासी ऋतुराज कुमार याने या परीक्षेत भरीव कामगिरी केली आहे. त्याने या परीक्षेत ९९.३९ टक्के गुण मिळवून शहराचे व कुटुंबाचे नाव उंचावले आहे. विशेष म्हणजे ऋतुराजने कोणत्याही कोचिंगच्या मदतीशिवाय पहिल्याच प्रयत्नात सेल्फ स्टडी करुन हे यश संपादन केले आहे. जाणून घेवूया त्याच्या यशाबद्दल…

वडिलांचे मार्गदर्शन आणि आईची प्रेरणा
ऋतुराजचे वडील संजीव कुमार हे हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे. ऋतुराज सुरुवातीपासूनच अभ्यासात अव्वल राहिला आहे. त्याने आर. मित्र हायस्कूलमधून 12वी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि 2023 मध्ये विज्ञान शाखेत 92.4 टक्के गुण मिळवून तो जिल्ह्यात (Success Story) पहिला आला. या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे मोठे योगदान असल्याचे ऋतुराज सांगतो. त्याच्या वडिलांनी त्याला सुरुवातीपासूनच अभ्यासात मार्गदर्शन केले तर आईची प्रेरणा सतत त्याच्या पाठीशी असते.

YouTube वरून घेतले मार्गदर्शन (Success Story)
ऋतुराजने जेईई सारख्या अवघड परीक्षेच्या तयारीसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नाही. तो घरी दररोज 9 ते 10 तास अभ्यास करायचा. त्याचा सेल्फ स्टडी करण्यावर जास्त भर होता. ऋतुराजने सांगितले की; “अभ्यासादरम्यान मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. प्रश्न सोडवताना संभ्रम निर्माण झाला किंवा तो प्रश्न समजला नाही; की मी यूट्यूबवर तज्ज्ञांचे व्हिडिओ पाहून मार्गदर्शन घेत असे. अशा प्रकारे मला अभ्यासात खूप मदत मिळाली. मला आयआयटीमधून (IIT) कॉम्प्युटर सायन्स शिकून आणि इंजिनीअरिंग करण्याची इच्छा आहे. पण सध्या माझे संपूर्ण लक्ष यूपीएससी (UPSC) परीक्षा देण्याकडे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com