Success Story : सर्वांना मोटिव्हेट करणारे संदिप माहेश्वरी आहेत कॉलेज ड्रॉपआउट; लहानपणी केलं काबाड-कष्ट; 12वीत सुरु केला बिझनेस 

करिअरनामा ऑनलाईन । संदीप माहेश्वरी हे नाव आज जगातील (Success Story) अव्वल मोटिव्हेशनल स्पीकरपैकी एक आहे; ज्यांच्यामुळे आज लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. जगात अपयशी लोकांची कमतरता नाही आणि संदीप माहेश्वरी ही अशी व्यक्ती आहे जी अयशस्वी लोकांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देते. आजच्या युगात कोणताही माणूस स्वार्थाशिवाय दुसऱ्या माणसाला मदत करत नाही, पण संदीप माहेश्वरी निस्वार्थपणे आपल्या चर्चासत्रांतून करोडो लोकांना नवीन मार्ग आणि नवी दिशा देत आहेत; तेही अगदी मोफत. चला तर मग आज या लेखात मी तुम्हाला संदीप माहेश्वरी यांनी इथपर्यंत पोहचताना केलेल्या संघर्षांबद्दल सांगणार आहे; यामुळे तुम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल.

Success Story of Sandeep Maheshwari

लहानपणीच केला आर्थिक समस्येचा सामना
संदीप माहेश्वरी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील रूप किशोर माहेश्वरी यांचा अॅल्युमिनियमचा व्यवसाय होता. संदीप शिकत असताना काही कारणास्तव वडिलांचा अॅल्युमिनियमचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. यावेळी संदीप 10 वीत शिकत होते. व्यवसाय बंद झाल्यानंतर त्यांच्या  वडिलांनी पीसीओचे दुकान उघडले, जिथे संदीप काम (Success Story) करायचे. यानंतर त्यांनी घरीच लिक्विडचे दुकान काढले, यातून तयार होणारे उत्पादन ते घरोघरी विकायचे. या कामातून मिळणाऱ्या पैशातून घर चालायचे. मात्र, हे कामही फार काळ चालले नाही आणि काही दिवसांनी ते काम बंद पडले. त्यामुळे बारावीनंतर संदीप यांनी अभ्यासासोबतच काम करण्यासही सुरुवात केली. त्यांनी छोट्या-मोठ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली. नोकरी करताना त्यांना शिक्षणाकडे दुर्लक्ष होवू द्यायचे नव्हते. यासाठी त्यांनी किरोरिमल कॉलेजमधून B.Com करायला सुरुवात केली, पण दिवसेंदिवस कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्यामुळे त्यांना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले.

 

 

 

 

Success Story Sandeep Maheshwari

मॉडेलिंगमध्येही आले अपयश (Success Story)
संदीप यांना मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र, इथेही त्यांना फारसे यश मिळाले नाही. येथे अनेक तरुण या क्षेत्रात धडपडत असल्याचे त्यांनी पाहिले, त्यामुळे त्यांना प्रेरणा देण्याचे काम का करू नये, असा विचार त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष्य बदलले आणि स्वतः घेतलेल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी लोकांना प्रेरित करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी फोटोग्राफीमध्येही नशीब आजमावायला सुरुवात केली.

Success Story Sandeep Maheshwari

‘माझी स्वतःची कंपनी उघडली’
आयुष्यात सतत अपयश येत होते; पण संदीप हार मानायला तयार नव्हते. त्यांनी ऑडिओ व्हिज्युअल प्रा. लि. नावाने कंपनी उघडली, पण इथेही ते फसले. काही काळानंतर हे काम त्यांना बंद करावे लागले. यानंतर त्यांच्या एका मित्राने त्यांना एका बहुराष्ट्रीय मार्केटिंग कंपनीत रुजू करून घेतले. जिथे काही दिवस काम करुनही संदीपला या कामात रस वाटला नाही त्यामुळे त्यांनी हे काम सोडले. यानंतर (Success Story) संदीप यांनी 2002 मध्ये 3 मित्रांसह एक कंपनी उघडली. यावेळी यश मिळेल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र ही कंपनी केवळ 6 महिनेच सुरु राहिली. संदीप यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “या अपयशानंतर मी खूप अस्वस्थ होऊ लागलो. कारण मी जे काही काम करत होतो त्यामध्ये मला अपयशाशिवाय काहीच मिळत नव्हते. मी कुटुंबातील सर्वात मोठा असल्याने माझ्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी होती.

 

 

 

Success Story Sandeep Maheshwari

फोटोग्राफीच्या जगात पाऊल ठेवले
संदीप माहेश्वरी यांना फोटोग्राफीची आवड होती. जेव्हा जेव्हा त्यांचे मन अस्वस्थ असायचे तेव्हा ते कॅमेरा घेऊन फोटोग्राफीसाठी बाहेर पडत असत. हे फोटो (Success Story) ते सेव्ह करायचे. 2003 मध्ये त्यांनी 10.45 तासांत 122 मॉडेल्सचे 10,000 हून अधिक वेगवेगळे फोटो काढले. यावेळी त्यांनी विश्वविक्रम केला. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली. यावेळी त्यांना या कामात यश मिळाले. त्याच्या यशस्वी प्रयत्नामुळे ते खूप आनंदी होते. इथूनच त्यांनी फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं ठरवलं.

Success Story Sandeep Maheshwari

प्रसिद्ध तरुण उद्योगपतींमध्ये होवू लागली गणना (Success Story)
या विश्वविक्रमानंतर संदीप माहेश्वरी यांनी स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी Imagesbazaar.com नावाची वेबसाइट तयार केली. सुरुवातीला या वेबसाईटवरून त्यांना फारसे यश मिळाले नाही, कारण त्यावेळी या वेबसाइटवर कमी फोटो असायचे. संदीप सुरुवातीला भारतीय मॉडेल आणि भारतीय छायाचित्रकारांचे फोटो पोस्ट करायचे. कालांतराने त्यांनी या वेबसाइटच्या डिझाइनमध्ये सुधारणा केल्या. यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. त्यांनी या वेबसाइटवर वर्ल्ड वाइड मॉडेल्सचे फोटो टाकण्यास सुरुवात केली. आज इमेज मार्केटमध्ये करोडो फोटो पहायला मिळतात. त्यांनी ही कंपनी वयाच्या 26 व्या वर्षी सुरू केली आणि वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी संदीप माहेश्वरी यांची गणना भारतातील प्रसिद्ध तरुण उद्योगपतींमध्ये होऊ लागली. Imagesbazaar.com हे संदीप माहेश्वरी यांच्या मेहनतीचे फळ आहे.

Success Story Sandeep Maheshwari

एक यशस्वी Motivational Speaker
संदीप यांच्या उच्च विचारसरणीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना ‘पायोनियर ऑफ टुमारो अवॉर्ड’, ‘यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रेन्योर अवॉर्ड’ आणि ‘स्टार अचिव्हर अवॉर्ड’ ही पदवी मिळाली आहे. आयुष्यात लाखो प्रयत्न करूनही अपयशी ठरलेल्या लोकांसाठी संदीप माहेश्वरी यांनी मोफत सेमिनार देण्यास सुरुवात केली आणि त्यांना कधीही न थांबण्याची आणि धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा (Success Story) दिली. संदीप यांनी दिलेले सेमिनार YouTube वर कोणीही सहज पाहू शकतात.  त्यांनी आजपर्यंत सेमिनार देताना कोणतीही फी किंवा देणगी घेतली नाही. पुन्हा एकदा एका व्यक्तीने सिद्ध केले आहे की आयुष्यात काहीही अशक्य नाही आणि तुमची स्वप्ने पूर्ण करणे सोपे आहे. आज संदीप माहेश्वरी अनेकांना प्रेरित करतात. त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास प्रवृत्त करतात. जे लोक अपयशी ठरतात, त्यांची ते हिम्मत वाढवतात आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देतात.  ही होती संदीप माहेश्वरी यांची यशोगाथा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com