UPSC Success Story: सायकलचे पंक्चर काढणारा झाला IAS; वरुण बरनवाल यांचा संघर्षमय प्रवास…

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राच्या बोईसर शहरात राहणाऱ्या वरुण बरनवाल यांच्या संघर्षाची कहाणी खूप प्रेरणादायक आहे. (Success Story of IAS Varun Baranwal) वरुण यांनी जिवनातील अनेक वर्ष गरिबीत घालवली. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. यातून मार्ग काढण्यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर वरुण यांनी वडील चालवत असलेल्या सायकलच्या दुकानात काम करायला सुरूवात केली. पुढील शिक्षणासाठी पैसे जमवण्यासाठी ते सायकलचे पंक्चर काढत होते. मेहनत आणि अभ्यास यांचा समतोल राखत वरुण यांचा प्रवास सुरु होता. १० वी ला ते शाळेत टॉपर होते. तर UPSC परीक्षेत संपूर्ण भारतातून ३२ वा क्रमांक पटकावून ते IAS ऑफिसर झाले. सायकलचे पंक्चर काढणाऱ्या वरुण बरनवाल यांनी IAS पदापर्यंत मारलेली मजल अव्वल आहे. जाणून घेऊया त्यांच्या संघर्षमय प्रवासाविषयी…

वरुण यांची घरची परिस्थिती तशी बिकटच. त्यांचे वडील सायकल दुरुस्त करण्याचे दुकान चालवत असत. काही काळ त्यांच्या वडिलांनी होलसेलचा धंदा देखील चालवला. पण दुकानात चोरी झाल्यानंतर धंद्याला फटका बसला. नंतर वरुण यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत होती. पैसे कमवण्यासाठी वरुण यांना अनेकवेळा सायकलचे पंक्चर काढण्याचे काम करावे लागले आहे. ते सांगतात एकीकडे काम सुरु होते आणि एकीकडे अभ्यास सुरु होता. शिकण्याची जिद्द होती, आवड होती पण खिशात पैसे नव्हते. १० विची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी शिक्षण थांबवून सायकलचे दुकान चालवण्याचा निर्णय घेतला होता. पण केवळ घरच्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना शिक्षण सुरु ठेवता आल्याचं ते सांगतात. (Success Story of IAS Varun Baranwal)

वरुण यांना शिक्षणात घरच्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्या आईने हिमतीने घर आणि दुकान संभाळल्यामुळे वरुण यांना शिक्षण घेणे शक्य झाले. वरुण यांनी सांगितले; की ११ वी आणि १२ वी हे दोन वर्ष त्यांच्या जिवनातील खूप अडचणीचे आणि आव्हानाचे होते. ते सकाळी ६ वाजता कॉलेजला जात असत, दुपारी २ वाजता कॉलेजमधून परतल्यावर २ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत शिकवणी घ्यायचे, त्यानंतर दुकानाचा हिशेब करायचे.

वरुण स्वतःला नशिबवान समजतात, कारण त्यांचा एक रुपया पण शिक्षणासाठी खर्च झाला नाही. नेहमी कोणी ना कोणी पुस्तकांसाठी, फॉर्मसाठी आणि फी साठी पैसे देत होते. वरुण यांचा सुरूवातीचा फी चा खर्च हा त्यांच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला. पण नंतर चिंता होती की दर महिन्याला लागणारे फी चे पैसे कुठून येणार याचे. वरुण यांनी मेहनत सुरू केली आणि विचार केला शाळेच्या प्रिन्सिपलला फी माफीसाठी विनंती करू आणि झाले ही तसे, वरुण यांच्या घरची स्थिती पाहता एका शिक्षकांनीच त्यांची ११ वी आणि १२ वीची फी भरली.

त्यानंतर इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाची १ लाख रुपये फी त्यांच्या आईने खूप कठोर परिश्रम करून भरली. नंतरच्या वर्षांची फी ही एका शिक्षकाच्या शिफारसीनंतर प्रोफेसर, डीन आणि कॉलेजच्या संचालकांनी वरुण यांची फी माफ केली. वरुण यांच्या मित्रांनीही त्यांना पैशांसाठी खूप मदत केली असल्याचे ते सांगतात.

हे पण वाचा -
1 of 27

इंजिनियरिंग पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी प्लेसमेंट ऑफर येत होत्या. (Success Story of IAS Varun Baranwal) पण वरुण यांनी UPSC ची परीक्षा देण्याचे निश्चित केले. UPSC च्या तयारी दरम्यान त्यांच्या भावाने त्यांना खूप मदत केली. पहिल्याच पयत्नात वरून यांनी UPSC परीक्षेत ३२ वा क्रमांक मिळवला आणि ते IAS सेवेत दाखल झाले.

ही आहे महाराष्ट्रातील बोईसर इथल्या वरुण बरनवाल यांची अनोखी कहाणी.. त्यांच्या मते मेहनत आणि सातत्य असेल तर आर्थिक अडचणीवर मात करत प्रत्येक व्यक्ती आपल्याला हव्या त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com