करिअरनामा ऑनलाईन । होय हे शक्य आहे…! फुल टाइम नोकरी करत UPSC परीक्षांची तयारी करून पास होणं; शक्य आहे का? तर होय हे शक्य आहे. (Success Story of IAS Aparna Ramesh) ही किमया केलीय अपर्णा रमेश यांनी. अपर्णा रमेश मूळच्या कर्नाटकातील. त्यांनी पूर्णवेळ नोकरी करून UPSC परीक्षेची तयारी केली. एवढेच नाही तर All India Ranking मध्ये त्या 35व्या स्थानावर पोहोचून IAS पदापर्यंत पोहचल्या.
दुसऱ्याच प्रयत्नात यश –
अपर्णा रमेश यांनी दुसऱ्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सर्वप्रथम त्यांनी 2019 च्या परीक्षेला हजेरी लावली होती. मात्र प्रिलियममध्ये त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर अपर्णा यांनी दुसरी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळवले.
सोप्पं नव्हतं… पण करून दाखवलं… (Success Story of IAS Aparna Ramesh)
आपल्या यशाबद्दल बोलताना अपर्णा रमेश म्हणतात; की “पूर्णवेळ नोकरी करून UPSC परीक्षेची तयारी करणे सोपे नाही. अभ्यासादरम्यान वेळेचे नियोजन करणे हे मोठे आव्हान होते. कारण ऑफिसमधून आल्यानंतर परीक्षेची तयारी करायला मला खूप कमी वेळ मिळत होता. पण लक्ष विचलित न करता मी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. वाचन करणे आणि नोट्स काढणे या गोष्टींवर जास्त भर दिला. परीक्षेनंतर मुलाखतीची तयारीही केली होती.यश मिळवणं सोप्पं नव्हतं पण न डगमगता करून दाखवलं.” अशा भावना अपर्णा यांनी व्यक्त केल्या.
तुम्ही वेळेचे नियोजन कसे केले?
अपर्णा रमेश यांनी वेळेचे नियोजन कसे केले? असं विचारलं असता त्या सांगतात… त्या रोज पहाटे 4 ते 7 या वेळेत अभ्यास करायच्या. त्यानंतर ऑफिसला जायची तयारी करून ऑफिस गाठायचं. दिवसभर ऑफिसमध्ये जबाबदारी पार पाडून घरी आल्यानंतर पुन्हा 2 ते 3 तास अभ्याससाठी वेळ द्यायचा. सुट्टीत किमान 8 ते 10 तास अभ्यास करायचा हा त्यांचा नित्याचा दिनक्रम होता.
नोकरी सोडण्यात अर्थ नव्हता…
अपर्णा म्हणतात; “परीक्षेच्या तयारीसाठी नोकरी सोडण्यात अर्थ नव्हता. त्यासाठी अभ्यास आणि नोकरी दोन्हीचा समतोल राखला. काय करायचं ते ठरलं होतं त्यामुळे धरसोड न करता फक्त काम आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करून निश्चित उद्देशापर्यंत पोहचता आलं.” अपर्णा यांना UPSC परीक्षेत 1004 गुण मिळाले आहेत. ज्यामध्ये लेखी परीक्षेत 825 आणि व्यक्तिमत्व चाचणीत 171 गुण मिळवून त्यांनी संपूर्ण देशातून 35 वा क्रमांक पटकावला आहे. (Success Story of IAS Aparna Ramesh)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com