दोन वर्षाच्या लहान बाळाला सोडून अभ्यासासाठी राहिल्या घरापासून दूर; विरोध सहन करून शेवटी अन्नु कुमारी बनल्या IAS

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की जर माणसाने आयुष्यात काही करायचे ठरवले आणि पूर्ण मेहनातीने प्रयन्त केले तर, यश नक्की मिळते. ज्या व्यक्ती विषयी आम्ही बोलत आहोत त्यांना पण समाजाने टोमणे दिले होते. परंतु, त्यांनी त्याची जरा पण पर्वा केली नाही. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूनच त्या थांबल्या. अनेक महिलांसाठी प्रेरणा स्त्रोत बनलेल्या अन्नु कुमारी यांची कथा खुप हृदयस्पर्शी आहे. हरियाणा सोनीपतच्या राहणाऱ्या अन्नु पूर्ण चार बहीण भावांमध्ये दुसर्‍या नंबरच्या होत्या. अन्नु यांचे वडिल एका हॉस्पिटलमध्ये एचआर डिपार्टमेंटमध्ये होते. घरातील इनकम काही खास नव्हते आणि आर्थिक तंगी तर सुरवातीपासूनच होती. अन्नु यांचे सुरवातीचे शिक्षण हरियाणामध्येच झाले, त्यानंतर त्यांनी हिंदू कॉलेज, दिल्लीमधून फिजिक्समध्ये डिग्री घेतली.

सोनीपत ते दिल्ली ट्रेनने प्रवास करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. एमबीए नंतरच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून त्यांना एका बँकेत मुंबईला नोकरी लागली. आणि दोन वर्ष त्यांनी तिथे नोकरी केली. 2012 मध्ये मुंबईमधून गुरुग्राम आल्या, जिथे त्यांच लग्न झाल. इथपर्यंत अन्नु यांच आयुष्य सामान्य चालू होत. या दरम्यान एक दिवस अचानक अन्नु यांच्या लहान भावाने त्यांना युपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्याच्या सल्ला दिला. परंतु या संबंधात कोणताही निर्णय घेणे इतके सोपे नव्हते. अन्नु आपल्या एका मुलासह संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत होत्या. अश्यात ह्या परीक्षेची तयारी करणे कोणतीही सोपी गोष्ट नव्हती. अन्नु यांनी सुरवातीला आपल्या सासरीच यूपीएससीची तयारी चालू केली. पण अन्नुसाठी सासरी तयारी करण शक्य होत नव्हत कारण त्यांचा बराच वेळ त्यांच्या मुलाला सांभाळण्यात जायचा.

परंतु, यादरम्यान अन्नु यांनी परीक्षेची गंभीरता लक्षात घेऊन एक निर्णय घेतला. त्या आपल्या 2 वर्षांच्या बाळाला सोडून त्यांच्या मावशीकडे गेल्या. येथे येऊन अन्नु यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. परंतु मुलाला सोडून अन्नू जिथे आल्या होत्या तो परिसर हा ग्रामीण भागातील होता. येथे लोक अन्नु यांना टोमणे मारत आणि बाळाला सोडुन आलेल त्या लोकांना आवडत नसे. पुष्कळ दिवस अन्नू यांनी आपल्या लहान मुलाला पाहिले पण नव्हते. अन्नु यांनी जेव्हा पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा, त्या पास झाल्या नाहीत. वर्ष 2017 मध्ये अन्नू यांनी दुसऱ्या प्रयत्नात परीक्षा पास केली. आणि आज त्या एक यशस्वी महिला अधिकारी आहेत.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com