यशोगाथा: क्लासशिवाय अनुकृतीने उत्तीर्ण केली UPSC परीक्षा! जाणून घ्या तिचा प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । बहुतेक स्त्रिया लग्नानंतर करिअर आणि अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतात. पण, काही स्त्रिया अशा आहेत की, ज्या लग्नानंतर करिअर करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराबद्दल सांगणार आहोत. जिचे नाव आहे अनुकृति शर्मा! अनुकृती यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. आणि, त्यात यशही मिळवले. या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी कोचिंग घेतले नव्हते किंवा कधी टेस्ट सिरीजदेखील लावली नाही. तरीही त्यांनी या मोठ्या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

अनुकृती यांचा यूपीएससीचा प्रवास थोडा लांबला. परंतु, त्यांनी नेहमीच आपले लक्ष अभ्यासाकडे ठेवले. वर्ष 2019 मध्ये अनुकृति यंची 138 व्या क्रमांकासह निवड झाली. त्याआधीही 2017 मध्ये त्यांनी यूपीएससी सीएसई परीक्षेचे तीनही टप्पे पास केले होते. एवढेच नाही तर, त्याची रँक 355 होती. आणि, त्यांची निवडही झाली होती. हा त्याचा चौथा प्रयत्न होता. वर्ष 2017 नंतर अनुकृती यांनी 2018 परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. एका वर्षाच्या विश्रांतीनंतर त्यांनी 2019 मध्ये परीक्षा दिली आणि यावेळी चांगल्या रँकमधून निवड झाली.

अनुकृति यांनी ऑनलाईन माध्यमातून सर्व तयारी केली. जर त्यांना कोणत्याही विषयावर काही वाचायचे असेल तर त्या इंटरनेटची मदत घेत असे. त्यांचा विश्वास आहे की, इंटरनेटवर सर्व गोष्टी उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने आपण तयारी करू शकता. कोचिंगशिवायही सेल्फ स्टडीच्या जोरावर तुम्ही परीक्षेत यश मिळवू शकता. अनुककृती म्हणतात की, प्रश्नात जे विचारले गेले आहे त्याचेच उत्तर द्यावे. उत्तरात आवश्यक नसलेले काहीही लिहू नका. फक्त महत्वाच्या गोष्टी लिहा. आपल्याला जिथेही वाटेल तेथे आकृती, फ्लोचार्ट वापरा. याने चांगले गुण मिळविण्यात मदत होते. उत्तर लिहिल्यानंतर ते टॉपरच्या उत्तराशी जुळण्यास विसरू नका. असा सल्ला त्यांनी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराना दिला आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com