Success Story : कोचिंग क्लास न लावता YouTube वरून केला अभ्यास; मेडिकल ते UPSC असा आहे आकांक्षा यांचा जिद्दी प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेचा खडतर प्रवास (Success Story) पार करण्यासाठी उमेदवारांना कोचिंग क्लासचा आधार घ्यावा लागतो. पण असेही काही उमेदवार असतात की जे कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय घरीच अभ्यास करुन ही खडतर अशी स्पर्धा परीक्षा पास करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराबाबत सांगणार आहोत. डॉ. आकांक्षा आनंद या 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी कोचिंग क्लासशिवाय अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात UPSC पास केली आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल…

आई शिक्षिका तर वडील क्लर्क
IAS आकांक्षा आनंद या बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. त्यांची आई शिक्षिका असून वडील शासकीय आरोग्य विभागात लिपिक आहेत. आपल्या मुलीने (Success Story) सरकारी अधिकारी व्हावं असं त्यांच्या आईचं स्वप्न होतं. मात्र आकांक्षा यांनी पहिल्यांदा पाटणा व्हेटर्नरी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. या कॉलेजच्या त्या गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनी आहेत.

डॉक्टर झाल्या नंतर सुरु केली UPSC ची तयारी (Success Story)
व्हेटर्नरीची पदवी घेवून डॉक्टर झाल्या नंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. महाविद्यालयीन जीवनापासूनच  त्यांना IAS अधिकारी बनण्याची इच्छा होती. पण व्हेटर्नरीची पदवी घेतल्यानंतर त्या डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे अभ्यास असा त्यांचा प्रवास सुरु होता. डॉ. आकांक्षा यांनी 2022 साली दुसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली होती. आकांक्षाने सांगितल्यानुसार, ती यूपीएससीच्या मुलाखतीच्या वेळी सीतामढीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या.  त्यामुळे नोकरी आणि अभ्यास अशा दोन्ही गोष्टी सांभाळणे कठीण झाले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरच्यांनी खूप सहकार्य केले.

YouTube वरुन केला अभ्यास 
पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना आकांक्षा यांना कोचिंग क्लासला जाता आलं नाही. त्यामुळे त्यांनी यूट्यूबची (YouTube) मदत घेतली. आकांक्षा सांगतात (Success Story) की त्यांनी UPSC परीक्षेची संपूर्ण तयारी घरी राहूनच केली. नोकरी सांभाळत त्यांचा अभ्यास सुरु होता. शेवटी त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांनी UPSC 2022 परिक्षेत संपूर्ण भारतातून 205वी रँक मिळवली. त्यांची IAS पदावर निवड झाली.

शेवटी UPSC निवडली 
UPSC च्या प्रवासाविषयी बोलताना आकांक्षा सांगतात की, एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना व्हेटर्नरीमध्ये पीजी करून करिअर सुरक्षित करण्याची संधी होती. या क्षेत्रामध्ये (Success Story) त्यांना त्यांचे करिअर सुरक्षित करण्याची मोठी संधी होती. पण दुसरीकडे त्यांना UPSC परीक्षा देवून अधिकारी व्हायचं होतं. शेवटी त्यांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि त्यांनी  UPSC निवड केली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com