Student Desk : बहुतांश स्कॉलर विद्यार्थ्यांची Arts ला पसंती आणि Science कडे पाठ; काय असेल कारण?

करिअरनामा ऑनलाईन। बोर्डाच्या परीक्षा यंदा नेहमीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यानंतर (Student Desk) वेळेत परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. यानंतर सुरू झाली ती अकरावी प्रवेशाची चुरस. अनेक दिवस CBSE चे निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना बरेच दिवस वाट बघावी लागली. मात्र आता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुण्यात ११ वी प्रवेशाच्या जाहीर झालेल्या कट ऑफ लिस्टमध्ये एक चकित करणारी गोष्ट दिसून आली आहे. ती म्हणजे सायन्सकडे राहणारा विद्यार्थ्यांचा कल अचानक आर्ट्स कडे वळू लागला आहे. नेहमी जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी किंवा स्कॉलर विद्यार्थी हे सायन्सकडे जाण्यासाठी इच्छुक असतात. मात्र यंदा तसं होताना दिसून येत नाहीये. अचानक स्कॉलर विद्यार्थ्यांचा कल आर्ट्सकडे वळला आहे. पण असं का होतंय? विद्यार्थ्यांचं मन बदललं? की विद्यार्थ्यांना सायन्सचा कंटाळा आला? नक्की काय आहे यामागचं कारण?

‘ही’ असू शकतात कारणं (Student Desk)

  • विद्यार्थ्यांचा कल आर्ट्स कडे असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्पर्धा परीक्षांकडे वाढत असणारा कल. देशातील लाखो विद्यार्थी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. आर्ट्समधून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ या परीक्षांची तयारी करण्यात घालवता येतो. तसंच आर्ट्समध्ये शिक्षण घेणंही सोपं आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याचे अधिक चान्सेस असू शकतात असं विद्यार्थ्यांना वाटत असावं. म्हणून आर्टस् विद्यार्थ्यांची पसंती ठरत आहे.
  • दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सायन्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि इतर काही बोटावर मोजण्याइतकी फिल्ड्स सोडलीत तर करिअरसाठी खूप कमी मार्ग आहेत. त्यात पुढे बारावीनंतर इच्छा आणि आवड बदलली तर फिल्ड बदलू शकणार नाही म्हणून विद्यार्थी आर्टस् चा मार्ग निवडत असावेत.
  • तिसरं कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती. असे अनेक विद्यार्थी असतात जे स्कॉलर असतात मात्र त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा विद्यर्थ्यांना सायन्समध्ये शिक्षण घेणं (Student Desk) परवडणारं नसतं. इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रातील कॉलेजची फि अवाढव्य असल्यामुळे त्यांना इच्छा नसतानाही आर्ट्समध्ये प्रवेश घ्यावा लागतो.
  • या सर्वांहून आवश्यक आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सायन्स क्षेत्रातील कमी होत चाललेल्या नोकऱ्या. सायन्समध्ये शिक्षण होऊन पदवी प्राप्त करूनही नोकरी नाही असे अनेकजण आहेत. टेक्नॉलॉजी कितीही पुढे जात असली तरी सायन्स क्षेत्रात पदवीनंतर नकऱ्या कमी झाल्या आहेत हे सत्य आहे. अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्या तुलनेने आर्ट्सक्षेत्रात खूप पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते. म्हणूनही आर्टसकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असण्याची शक्यता आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com