SSC Exam : खुषखबर!! 10 वीच्या ‘या’ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार; ताबडतोब करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (SSC Exam) बसलेल्या तसेच शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत कळविण्यात आले आहे. विविध स्तरावरुन मागणी होत असल्याने हे प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती.

तसेच, काही तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित करण्यात आलेल्या वाढीव मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करता आले नसल्याने तसेच कोणताही (SSC Exam) पात्र विद्यार्थी अतिरिक्त गुणांपासून वंचित राहू नये, यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी (SSC Exam) संलंग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास नरड यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

यासाठी सर्व विभागीय मंडळांनी त्वरित कार्यवाही करावी. कोणताही (SSC Exam) पात्र विद्यार्थी गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधितांनी नोंद घेण्याबाबत राज्यमंडळाव्दारे सांगण्यात आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com