SPPU Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढली भरतीची जाहिरात 

करिअरनामा ऑनलाईन ।  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Recruitment 2024) प्राध्यापक भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध विभागातील 111 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे तर 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भरली जाणारी पदे – 
1. प्रोफेसर
2. असोसिएट प्रोफेसर
3. असिस्टंट प्रोफेसर
पद संख्या – (SPPU Recruitment 2024)
1. प्रोफेसर – 32 पदे
2. असोसिएट प्रोफेसर – 32 पदे
3. असिस्टंट प्रोफेसर – 47 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – Savitribai Phule Pune University, Ganeshkhind, Pune-411007

कोणत्या संवर्गासाठी किती जागा –
असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 47 जागा उपलब्ध असल्या तरी त्यातील १५ जागा खुल्या प्रवर्गासाठी , 15 जागा ओबीसी संवर्गासाठी , ५ जागा ईडब्ल्यूएस संवर्गासाठी, ४ जागा एसटी संवर्गासाठी, ३ जागा डी.टी-ए संवर्गासाठी, 2 जागा एन टी-सी संवर्गासाठी तर प्रत्येकी 1 जागा एससी, एनटीसी (SPPU Recruitment 2024) आणि एसबीसी संवर्गासाठी आहे.
असिस्टंट प्रोफेसर पदाप्रमाणेच प्रोफेसर व असोसिएट प्रोफेसर पदासाठी सुद्धा संवर्गनिहाय उपलब्ध जागांची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संबंधित पदासाठीची पात्रता व इतर आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
अर्ज फी –
खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी – 1000/- रुपये
आरक्षित संवर्गासाठी – 500/- रुपये

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com