SPPU Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भरतीला मुदतवाढ; 16 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU Recruitment 2024) विविध विभागांमध्ये 111 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी यामध्ये काही दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे; अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी दिली आहे.

असं आहे समांतर आरक्षण
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 25 जानेवारी रोजी समांतर आरक्षणासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार भरती करताना सामाजिक व समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे; असे राज्य शासनातर्फे अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले. समांतर आरक्षणामध्ये 30 टक्के महिला आरक्षण, 4 टक्के दिव्यांग ,5 खेळाडू आदी आरक्षणाबाबत स्पष्टता आहे. त्यामुळे या पदांची शैक्षणिक अर्हता, आरक्षण व इतर सर्व बाबींमध्ये बदल केला असून ही माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.

16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन करता येणार अर्ज (SPPU Recruitment 2024)
डॉ. खरे पुढे म्हणाले; प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र सामाजिक व समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागणार असल्याने उमेदवारांना अर्ज करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना आता येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जाची हार्ट कॉपी येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार आहे. सुधारित माहिती admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-भरती विषयी अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com