Sports Success Story : जिद्द यालाच म्हणतात!! वडिलांनी जमीन विकून रायफल आणली; मुलानं जिद्दीनं मैदान मारलं

करिअरनामा ऑनलाईन । यशाच्या मार्गात अडथळे येणं अटळ आहे. पण जो (Sports Success Story) हार न मानता अडथळे पार करतो, तोच निश्चित ध्येय गाठू शकतो. पंजाबचा रायफल शूटर देवांश प्रियने उत्तुंग कामगिरी करुन दाखवली आहे. देवांशने अखिल भारतीय विद्यापीठ रायफल नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. देवांशच्या या यशानंतर आता त्याच्या घरी त्याचं अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

देशात आज अनेक खेळाडू प्रतिकूल परिस्थितीतवर मात करत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचं नाव उंचावत आहेत. कोणत्याही खेळाडूच्या यशात प्रशिक्षकांसोबत (Sports Success Story) पालकांचा मोठा वाटा असतो. आपल्या मुलांची खेळाची आवड जोपासण्यासाठी अनेक पालक मोठ्या कष्टाने किंवा प्रसंगी कर्ज काढून त्यांच्या मुलांची खेळाशी निगडीत गरज भागवतात. आपल्या मुलानं त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी व्हावं; ही त्यांची भूमिका असते. विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या देवांश प्रियची कहाणी अशीच आहे.

सरावासाठी रायफल नव्हती (Sports Success Story)

सराव करण्यासाठी देवांशकडे रायफल नसल्याचे समजताच त्याच्या वडिलांनी जमीन विकून देवांशसाठी महागडी प्रोफेशनल रायफल खरेदी केली. देवांशनेदेखील वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं.

जिंकले सिल्व्हर मेडल

देवांश प्रियने दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय विद्यापीठ 2023 स्पर्धेत 50 मीटर 3p स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या टुर्नामेंटमधील शूटींग स्पर्धांमध्ये देशातील टॉप 77 विद्यापीठांना (Sports Success Story) आमंत्रित करण्यात आले होते. यात प्रतिभावान ऑलम्पिक स्तरावरील खेळाडूंचा ही समावेश होता. यामध्ये देवांशने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसोबत देवांश या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ‘खेलो इंडिया गेम्स’साठी पात्र ठरला आहे.

वडिलांनी जमीन विकून रायफल खरेदी केली

सहरसा येथील रहिवासी असलेले देवांशचे वडील बी.एन. सिंह म्हणाले; “हे यश मिळवण्यासाठी त्याने घेतलेल्या कष्टाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. एक वेळ अशी होती की देवांशला रायफलची गरज होती. पण ती खरेदी करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मी शहरी भागातील जमीन (Sports Success Story) विकून माझ्या मुलाला रायफल खरेदी करून दिली.” देवांश प्रिय पंजाबमधील जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. या पूर्वी तो केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या नॅशनल 50 मीटर थ्री पी अँड प्रोन साइड रायफल शूटिंग स्पर्धेत तो पात्र ठरला होता. त्यानंतर त्याची नॅशनल रिनाउंड शूटर म्हणून निवड झाली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com