Sports Success Story : …आता मुलगी नको म्हणून नाव ठेवलं ‘अंतिम’; हीच मुलगी बनली वर्ल्ड चॅम्पियन!

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील अनेक महिला खेळाडू (Sports Success Story) आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव चमकवत आहेत. ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल खेळापर्यंत भारतीय महिला खेळाडूंनी उठावदार कामगिरी करुन देशातील महिला कोणत्याही बाबतीत मागे नसल्याचे सिद्ध केले आहे. गेल्यावर्षी जागतिक अंडर-20 कुस्ती स्पर्धेत एका महिला कुस्तीपटूने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून देशाचे नाव उंचावले. या महिला कुस्तीपटूचे नाव अंतिम पंघाल आहे. अंतिम चे नाव एका अर्थाने नकारात्मक असू शकते पण ती तिच्या कारकिर्दीत टॉपवर पोहचली आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून पंघालने इतिहास रचला. या पुरस्कारानंतर गोल्ड मेडल जिंकणारी ती भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. चला जाणून घेऊया अंतिमच्या करिअरविषयी…

Sports Success Story Antim Panghal

कोण आहे अंतिम पंघाल
अंतिम पंघाल ही  हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातील भगाना गावची रहिवासी आहे. तिच्या वडिलांचे नाव रामनिवास पंघाल आणि आईचे नाव कृष्णा कुमारी आहे. ती तिच्या कुटुंबातील चौथी मुलगी आहे, म्हणून तिच्या जन्माच्या वेळी तिच्या पालकांनी तिचे नाव अंतिम ठेवले. किंबहुना त्या (Sports Success Story) गावची प्रथा आहे की ज्या घरात अनेक मुली जन्माला येतात, त्यांना काफी किंवा लास्ट अशा नावांनी संबोधले जाते. जास्त मुली जन्माला येणार नाहीत या विश्वासाने लोक हे करतात. आज जरी समाज पुढारला असला तरी अंतीमच्या जन्माच्यावेळी परिस्थिती वेगळी होती. रामनिवास पंघाल यांना आधीच तीन मुली होत्या. कुटुंबाला मुलगा हवा होता पण त्यांना तीन मुली झाल्यानंतर चौथी मुलगीच झाली; म्हणून त्या मुलीचे नाव अंतिम ठेवणं भाग पडलं.

Sports Success Story Antim Panghal

ट्रेनिंगसाठी रोजचा 20 कि.मी. चा प्रवास (Sports Success Story)
गावातील प्रथेप्रमाणे तिचे नांव ठेवण्यात आले असले तरी तिच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला नेहमीच प्रोत्साहन दिले. जेव्हा अंतीमने कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा तिच्या वडिलांनी तिचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. अंतीमची मोठी बहीण सरिता ही राष्ट्रीय स्तरावरील (Sports Success Story) कबड्डीपटू आहे. या दोघी बहिणी हिसारपासून 20 किलोमीटर दूर ट्रेनिंगसाठी जात होत्या. त्यांचे वडील नियमितपणे दोन्ही मुलींना प्रशिक्षणासाठी घेऊन जायचे. रामनिवास यांच्यासमोर अनेकदा आर्थिक अडचणी उभ्या रहायच्या. बऱ्याचवेळा मित्रांकडून उधारीने पैसे घेवून त्यांना घराचे भाडे भरावे लागायचे. अशा आर्थिक अडचणींचा सामना करताना त्यांनी मुलींच्या ट्रेनिंगमध्ये कधी खंड पडू दिला नाही.

Sports Success Story Antim Panghal

अशी आहे कुस्तीची कारकिर्द
अंतीमने प्रशिक्षक रोशनी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीला सुरुवात केली. अथक परिश्रमानंतर तिने अखेर आशिया अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. याशिवाय 17 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत कांस्यपदक आणि 23 वर्षांखालील आशियामध्ये रौप्य पदक जिंकले. वयाच्या (Sports Success Story) अवघ्या 17 व्या वर्षी अंतिम पंघालने ज्युनियर रेसलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतासाठी इतिहास रचला.
अंतिम पांघल सोबत अजून सहा कुस्तीपटूंनी देखील पदकाची कमाई करत भारताला सांघिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचवले. 76 किलो वजनी गटात प्रिया मलिकने रौप्य, 62 किलो वजनी गटात सोनम मलिकने रौप्य, 65 किलो वजनी गटात प्रियांकाने रौप्य, 57 किलो वजनी गटात सितोने कांस्य, 72 किलो वजनी गटात रितिकाने कांस्य तर 50 किलो वजनी गटात प्रियांशीने देखील (Sports Success Story) कांस्य पदक जिंकले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com