Skill Development : तुम्हाला वाढत्या स्पर्धेत टिकून रहायचं आहे? तर मग नोकरीसह ‘इथून’ करता येईल कौशल्य विकास; फी आहे अगदी कमी

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या स्पर्धेच्या युगात अनेकजण नोकरी (Skill Development) करताना इतर कौशल्ये शिकण्यावर भर देतात; जेणेकरून पगारासोबत जादा कमाई करता येते जर तुम्हालाही अभ्यास किंवा नोकरीसोबत कौशल्य प्रशिक्षण घेऊन पुढे जायचे असेल, तर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल’ म्हणजेच NIOS तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. ही शैक्षणिक संस्था तुम्हाला अगदी कमी फी मध्ये शिक्षणासोबत प्रशिक्षण आणि कौशल्य विकास करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करते. NIOS मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही; कारण तुम्ही घरी बसून ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

अत्यंत माफक फी मध्ये शिकता येतील वेगवेगळे कोर्स
NIOS च्या एक वर्षाच्या माध्यमिक अभ्यासक्रमाची फी (Skill Development) पुरुष सामान्य श्रेणीसाठी 1800 रुपये, महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी 1450 रुपये आणि इतर श्रेणीसाठी 1200 रुपये आहे. तर उच्च माध्यमिक अभ्यासक्रमासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील पुरूषांसाठी 2000 रुपये, महिला आणि ट्रान्स जेंडर उमेदवारांसाठी 1650 रुपये, तर इतर वर्गासाठी 1300 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी देशातील योग्य संस्था (Skill Development)
एनआयओएसचे (NIOS) अध्यक्ष प्रोफेसर सरोज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयओएसची देशभरात 10 हजार केंद्रे आहेत. इथे तुम्हाला आशा आरोग्य सेविकांवर आधारित अनेक अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम, आदिवासी मुलींसाठी जश्मी प्रकल्प, कस्तुरबा गांधींसाठी कौशल्य, विणकरांसाठी शिक्षण आणि अनेक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत. NIOS बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही nios.ac.in या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती घेवू शकता. येथे ऑनलाइन प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही घरी बसून ऑनलाइन क्लासेस करू शकता.

एनआयओएसचे अध्यक्ष म्हणाले की, जेथे सामान्य शिक्षण (Skill Development) उपलब्ध नाही तेथे आम्ही दूरस्थ आणि मुक्त शिक्षणाद्वारे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या कालावधीनंतर एनआयओएसच्या विद्यार्थ्यांना एनआयओएसचे महत्त्व समजले आहे. यामध्ये कौशल्य विकासाबरोबरच शिक्षण आणि प्रशिक्षणासाठीही चांगली संख्या नोंदणी होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com