SET Results 2023 : ‘या’ तारखेला जाहीर होणार SET परीक्षेचा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये (SET Results 2023) सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या ‘स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट’ म्हणजेच SET परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 26 मार्च रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जवळपास दीड महिना उलटला असून, उमेदवारांमध्ये या निकालाबाबत उत्सुकता आहे.
UGCच्या वतीने पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेची पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध होऊन त्यावर हरकती नोंदविण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली होती. त्यानंतर अंतिम उत्तरतालिका (SET Results 2023) व लगेच निकाल जाहीर करण्याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. याबाबत विद्यापीठाशी संपर्क साधला असता, मे महिन्याच्या अखेरीस हा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या परीक्षेची पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर, त्यावर उमेदवारांकडून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर आता अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध होऊन, निकालाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्यभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. 1 लाख 1 हजार 37 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. या परीक्षेच्या उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासाठी 5 मे पर्यंतचा कालावधी (SET Results 2023) दिला होता. त्यामुळे आता उमेदवारांकडून आलेल्या आक्षेपांची पडताळणी सुरू असून, त्यानुसार पुन्हा एकदा अंतिम सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी निकाल जाहीर केला जाणार आहे.

SET दोनवेळा घेण्याची मागणी (SET Results 2023)
राज्य सरकारकडून प्राध्यापक भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाविद्यालये तसेच विद्यपीठाच्या विविध विभागांमध्ये ही प्रक्रिया होणार आहे. CHB तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे NET परीक्षेप्रमाणे SET परीक्षा वर्षातून दोनदा घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com