सेट (SET) परिक्षेची तारीख घोषित; ‘या’ तारखेला होणार परिक्षा

करिअरनामा ऑनलाईन | सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परिक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन आणि गोवा शासन प्राधिकृत आणि यु.जी. सी, नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी मार्फत आयोजित 37 वी सेट परीक्षा ही रविवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे ऑनलाईन अर्ज हे 17 मे 2021 रोजी सुरू होतील. तर, 10 जून रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

सेट परीक्षेतील ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि या संदर्भात संपूर्ण माहिती ही विद्यापीठाच्या सेट परीक्षा संकेतस्थळावर 17 मे 2021 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेट परीक्षेचे संकेतस्थळ हे: https://setexam.unipune.ac.in आहे. यावर अर्ज आणि इतरी माहिती दिलेल्या वेळात मिळेल.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com