SET Exam 2023 : महाराष्ट्र ‘सेट’ परीक्षा ‘या’ तारखेला होणार

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक (SET Exam 2023) पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) 26 मार्चला घेण्यात येत असून, त्यासाठी एक लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला आहे. या सर्व उमेदवारांना त्यांच्या Log in मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) आयोजन करण्यात येते. यंदाची 38 वी परीक्षा ही 26 मार्च 2023 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथील 17 शहरांमध्ये या परीक्षेचे (SET Exam 2023) आयोजन केले आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र 16 मार्च 2023 पासून उमेदवारांच्या ‘लॉग इन’मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रवेशपत्र असं करा डाउनलोड (SET Exam 2023)

आवश्यक त्या सूचनांसह प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवरदेखील पाठविण्यात आले आहे. याबाबतची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि ‘सेट’चे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. उमेदवारांनी https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या ‘लॉग इन’मधून आपला नोंदणी क्रमांक टाकून 26 मार्च 2023 पूर्वी प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे. प्रवेशपत्र (SET Exam 2023) व मूळ ओळखपत्र असल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. 26 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सकाळी 10 वाजल्यानंतर कोणत्याही सबबीवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी 2 तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन सेट विभागाने केले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com