Scholarship for Women in Stem : महिलांच्या उच्चशिक्षणासाठी ब्रिटिश कौन्सिलची ‘स्टेम’ शिष्यवृत्ती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा (Scholarship for Women in Stem) सहभाग वाढावा, या हेतूने ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटन येथील विविध विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘स्टेम’ शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

जगभरातील महिलांसाठी आहे शिष्यवृत्ती
तुम्ही उच्चशिक्षित आहात आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असाल, तर ही शिष्यवृत्ती तुमच्यासाठीच आहे. जगभरातील महिलांसाठी या विशेष शिष्यवृत्तीची घोषणा (Scholarship for Women in Stem) नुकतीच करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि नवनिर्मितीत महिलांची संख्या वाढावी म्हणूनच ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

कुठे मिळेल प्रवेश?
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी तुम्हाला ब्रिटनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी, ग्रीनविच युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टनमध्ये प्रवेश घेता येईल.

असं आहे शिष्यवृत्तीचं स्वरुप (Scholarship for Women in Stem)
1. या शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक शुल्क, स्टायपेंड, प्रवास खर्च, व्हिसा, आरोग्य विमा या गोष्टींचा समावेश असेल.
2. डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, फार्मास्युटिकल सायन्स, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, सिव्हिल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, इंटेलिजंट हेल्थकेअर आदी अभ्यासक्रम विद्यार्थी निवडू शकतात. (Scholarship for Women in Stem)
3. भारतासह दक्षिण आशियातील विद्यार्थिनींसाठी २५ टक्के शिष्यवृत्ती राखीव असेल.
4. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://www.britishcouncil.in/study-uk/scholarships
या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com