करिअरनामा ऑनलाईन। पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून (Police Bharti) सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.
गृह विभागाच्या वतीने पोलिस चालक, पोलिस शिपाई व राज्य राखीव पोलिस बल या संवर्गातील १८ हजार ३३१ पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी तब्बल १८ लाखांहून अधिक अर्ज आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडे (Police Bharti) चालकाच्या ७३ तर पोलिस शिपायाच्या ९८ जागा असून त्यासाठी जवळपास १४ हजार अर्ज आले आहेत. तर ग्रामीणमधील ५४ जागांसाठी सव्वातीन हजार अर्ज आलेले आहेत. माजी सैनिकांसह अन्य घटकातील उमेदवारांसाठी परीक्षा पद्धती थोडी वेगळी आहे. यंदा प्रथमच या भरतीसाठी तृतीयपंथींना संधी देण्यात आली असून, त्यासंबंधीचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी परीक्षा पद्धती कोणती ठेवायची, हा मोठा प्रश्न गृह विभागासमोर आहे. त्यासंबंधीचे नियोजन केले जात आहे, पण नियमित उमेदवारांची परीक्षा त्यामुळे थांबणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे.
लेखीसाठी OMR प्रश्नपत्रिका (Police Bharti)
पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी दहा जण लेखीसाठी निवडले जातील. अंकगणित, सामान्यज्ञान (चालू घडामोडी), बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल. चालक उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालविण्याची जादा टेस्ट (Police Bharti) द्यावी लागणार असून, त्यात उत्तीर्ण व्हावेच लागेल. दरम्यान, प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी दिली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून, मानवी हस्तक्षेप काहीच नसेल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.
अशी होईल मैदानी चाचणी – (Police Bharti)
- गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) –
८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण (Police Bharti) आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.
- गोळाफेक (महिला : ४ किलोचा गोळा) –
६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ५.५० ते ६ मीटर : १२ गुण, ५ ते ५.५० मीटर : १० गुण, ४.५० ते ५ मीटर : ५ गुण, ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण ४.५० मीटरपेक्षा कमी : ३ गुण. चार मीटरपेक्षा कमी पडल्यास काहीच गुण मिळणार नाहीत.
- १०० मीटर धावणे (पुरुष) –
११.५० सेकंद : १५ गुण, ११.५० सेकंदापेक्षा जास्त व १२. ५० सेकंदापेक्षा (Police Bharti) कमी : १२ गुण, १२.५० सेकंद व १३.५० सेकंदापेक्षा कमी : १० गुण, १३.५० सेकंद ते १४.५० सेकंद : ८ गुण, १४.५० ते १५.५० सेकंद : ६ गुण, १५.५० ते १६.५० सेकंद : ४ गुण, १६.५० ते १७.५० गुण : एक गुण.
- १०० मीटर धावणे (महिला) –
१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.
- ८०० मीटर धावणे (महिला) –
२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण. (Police Bharti)
- १६०० मीटर धावणे (पुरुष) –
५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com