Police Bharti : पोलीस भरतीबाबत मोठी खुषखबर!! राज्यात 23 हजार 628 पदे भरणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून (Police Bharti) राहिलेल्या राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमीआहे.  महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे ही भरती होणार आहे. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती; त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे आता 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार ही भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

70 वर्षाने केला नवीन आकृतीबंध (Police Bharti)
गेल्या ७० वर्षांत आकृतीबंध झाला नव्हता त्यामुळे जून महिन्यात राज्याचा आकृतीबंध करण्यात आला. यामुळे राज्यात पोलिसांची संख्या किती आहे आणि किती भरण्याची गरज आहे, त्याची माहिती मिळाली, असे सतेज पाटील यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, राज्याच्या गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. पोलीस दलात भरतीची प्रक्रिया सुरु आहे. परंतु नवीन आकृतीबंधानुसार जागा वाढल्या आहेत.  यामुळे नवीन आकृतीबंधानुसार पोलीस भरती होणार आहे. यासाठी गृहमंत्रालयाने निधी उपलब्ध केला आहे.

दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती कर्मचारी असले पाहिजे, असा सर्व आकृतीबंध झाला आहे. मागील दोन वर्षांत कोरोना साथीमुळे भरती झाली नव्हती. त्यानंतर ही भरती सुरु झाली आहे. त्याकाळात देण्यात आलेली वयोमर्यादेच्या वाढीची मुदत आता (Police Bharti) संपणार आहे. ती संपण्याच्या आत नवीन भरती करता येईल का? हा विचार करण्यात येणार आहे. यासाठी आधी जाहिरात काढून हवे तर नंतर भरती करता येईल का? हा निर्णय गृहविभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com