Police Bharti 2024 : “पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या”; समन्वय समितीची मागणी

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी १७ हजार ५०० पदांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती जाहीर केली आहे. यासाठी १५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला नुकतेच दहा टक्के एसीबीसी (ACBC Reservation) आरक्षण दिले. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील तरुणांकडून एसीबीसी प्रमाणपत्र (ACBC Certificate) मागवण्यात आले होते. आरक्षण दिल्यानंतरची ही पहिलीच भरती असल्याने अनेक उमेदवारांची तारांबळ उडाली आहे तर काही तरुणांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे एसीबीसी प्रमाणपत्र न मिळाल्याने अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे गरजू मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी कमीत कमी दोन दिवस तरी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी; अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सरकारकडे केली आहे.

शासनाने मराठा समाजाला 10 टक्के एसीबीसी आरक्षण दिले आहे; पण एसीबीसीचे प्रमाणपत्र मराठा समाजाला प्राप्त होण्यात उशीर होत आहे. बऱ्याच ठिकाणी खूप अडचणी देखील (Police Bharti 2024) आल्या आहेत. पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची तारीख संपत आली असताना सुद्धा काहींना एसीबीसीचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. आता पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची तारीख संपलेली आहे पण बऱ्याच मुलांना अजूनही भरतीसाठी फॉर्म भरता आला नाही.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवार (Police Bharti 2024) पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सरकारला विनंती आहे की अजून कमीत कमी दोन दिवस तरी मुलांना फॉर्म भरण्याची तारीख वाढवून मिळवावी. मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. असेही निवडणूक आचारसंहितेमुळे परीक्षा निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत. त्यामुळे तरुणांचे हित लक्षात घेवून अर्ज भरण्यासाठी कमीत कमी दोन दिवस तरी वाढवून द्यावेत; असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्टद्वारे शेअर केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com