Police Bharti 2022 : पोलीस भरती संदर्भात महत्वाची बातमी!! आधी होणार मैदानी चाचणी

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वाची बातमी समोर (Police Bharti 2022) आली आहे. येत्या जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांच्या होणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे तरुण अर्ज करणार आहेत त्यांची पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीबाबत गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडी सरकारने भरती पद्धतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ग्रामीण तरूणांना पोलीस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू आहे. पण, त्याची अंमलबजावणी आता आगामी भरतीवेळी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काही ठळक बाबी – (Police Bharti 2022)

  • पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार.
  • राज्याच्या गृह विभागात तब्बल 49 हजार 500 पदे रिक्त.
  • पहिल्या टप्प्यात 2020 मधील 7 हजार 231 पदांची भरती होणार.
  • पुढील टप्प्यात 2021 आणि 2022 मधील रिक्तपदांची एकत्रित भरती होणार.
  • पोलिस नाईक झालेले होणार हवालदार; गृह विभागाने रद्द केले नाईक पद.

यापूर्वीच मागील काही वर्षांमध्ये पोलीस भरती करण्याचे नियोजन झाले होते. पण (Police Bharti 2022) मध्यंतरी कोरोना निर्बंधामुळे दीड ते दोन वर्ष पूर्ण क्षमतेने पोलीस भरती झाली नव्हती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलीस भरती करण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत वेग घेतला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com