Police Bharati 2022 : भावी पोलिसांनो!! आधी होणार मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा; पोलीस भरतीसाठी सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरती कधी होणार याकडे तरुणांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या (Police Bharati 2022) मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2020 पासून रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मान्यता मिळाली आहे. राज्यात लवकरच तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तमाम तरुण, तरुणींसाठी राज्य सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता राज्य सरकारने भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. जाणून घेवूयात या बदललेल्या नियमांविषयी …

आधी होणार शारीरिक चाचणी – 

शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली (Police Bharati 2022) जाणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या भरतीसाठी सुरवातीला परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यांनतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

म्हणजेच आतापर्यंत होणारी परीक्षा ही लेखी आणि आऊटर प्रकारची होत होती. मात्र आता पहिल्यांदाच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा मोठा लाभ होणार आहे असं राज्याच्या गृह मंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र हा नियम नक्की होता तरी काय हे जाणून घेणं आवश्यक आहे.

असे बदलले नियम – (Police Bharati 2022)

आतापर्यंत या नियमांमध्ये तीन वेळा बदल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीत संधी मिळावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा त्यात बदल करून पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता महाविकास आघाडी सरकारने भरती पध्दतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रांगड्या गड्यांनाही पोलीस भरतीत आपलं नशीब आजमावता येणार आहे आणि पोलीस होता येणार आहे.

या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान (Police Bharati 2022) मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल; असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com