MPSC ची परीक्षा तर पुढं गेली, आता अभ्यासाचं नियोजन कसं कराल?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन बऱ्हाटे

नोवेल कोरोना आरोग्य आणीबाणीच्या पार्श्र्वभूमीवर 2020 मधील स्पर्धा परीक्षाच्या नियोजनात बदल झाले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिल ऐवजी 26 एप्रिल ला घेण्यात येणार असुन, संयुक्त गट ब (PSI-STI-ASO) परीक्षा 3 मे ऐवजी 10 मे रोजी होणार आहे. म्हणजे राज्यसेवा 21 दिवसांनी आणि संयुक्त गट ब फक्त 7 दिवसांनी पुढे गेली आहे. यातील तोट्यांकडे आपण सकारात्मक राहण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष करूयात आणि उरलेल्या दिवसांत प्रभावी नियोजना आधारे आपापले धेय्य गाठुया. होणा-या बदलाला ‌दोष देत बसण्यापेक्षा “बदल स्विकारणे कधीही उत्तमच, “वेळेनुसार जो स्वतःमध्ये बदल घडवतो तोच टिकु शकतो नाहीतर डायानासोर होण्यास वेळ लागणार नाही” हा निसर्ग नियम आहे, आपल्याला निसर्गाचे नियम स्विकारावेच लागतात, मनुष्य निसर्गासमोर किती शुल्लक आहे हे कोरोना सारख्या आपत्तींनी वेळोवेळी सिद्धच केले‌ आहे, त्यामुळे हा बदल आपण या क्षणांना स्विकारुन स्वतःला पुन्हा अभ्यासाच्या तयारीत झोकुन देऊया …पण कसे ते पाहु

समजा, MPSC ची तयारी करणार्यांचे तीन गटांत विभाजन केले तर

A. फक्त राज्यसेवा तयारी करणारे परीक्षार्थी –
तुम्हाला 21 दिवस अधिकचे मिळाले आहेत, संधींचा फायदा घ्या,
1. राहीलेले उजळणीचे घटक व्यवस्थित उजळणी करुन घ्या.

  1. जे पेपर आतापर्यंत सोडवले आहेत ते सर्व उजळणी करुन घ्या.
  2. आयोगाचे मागील वर्षाचे सर्व प्रश्र्न पुन्हा पुन्हा सोडवुन घ्या,नव्याने सतत विश्लेषण करत रहा.
  3. CSAT चा सराव वाढवा, आयोगाचे उतारे, गणित आणि बुद्धीमान चाचणी प्रश्नांच्या स्वरुपाचे अधिक प्रश्र्न सोडवा.
  4. जानेवारी 2020 ते 10 एप्रिल 2020 च्या चालु घडामोडींचे वाचन बऱ्याचदा घाईत होते, ते व्यवस्थित करा (सोबत 2019 संपुर्ण वर्षांची उजळणी अनिवार्यच आहे)

B. फक्त PSI-STI-ASO पुर्व परीक्षा फोकस परीक्षार्थी – हा बदल तुमच्या नियोजनावर जास्त परीणाम करीत नाही, परीस्थिती “जैसे थे” च असल्यासारखी आहे, फक्त 7 दिवस अधिक उजळणी साठीचे तुम्हाला मिळाले आहेत. अजुनही अंदाजे 50 दिवस तुम्हाला मिळत आहेत.

  1. सर्व घटक विषयानुसार पुन्हा पुन्हा उजळणी करुन घ्या
  2. एक तासांचे पेपर नियोजना साठी दररोज एक पेपर सोडवा किंवा अधिकाधिक प्रश्नसराव करा
  3. आयोगाचे मागील परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्र्न तोंडपाठ करुन घ्या.
  4. गुण मिळणारे आणि गुण कमी मिळणारे विषयांचा गट करुन, गुण मिळणार्या विषयांवर जास्तीची तर कमी गुण मिळणार्या विषयांवर सरासरी तयारी करा.
    5.जानेवारी 2020 ते 30 एप्रिल 2020 च्या चालु घडामोडींचे वाचन परीक्षांमुळे बर्याचदा घाईत होत असते, ते व्यवस्थित करा (सोबत 2019 संपुर्ण वर्षांची उजळणी अनिवार्यच आहे)

C. दोन्हींची तयारी करणारे परीक्षार्थी –
या बदल तुमच्या साठी सर्वात दुष्परिणाम करणारा आहे, कारण दोन पेपरच्या मध्ये पुर्वी मिळणारा 1 महीन्याचा कालावधी आता 15 दिवसांवर आला आहे. त्यामुळेच स्पर्धा परीक्षेतील “फोकस परीक्षा तयारी असावी” याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. तरीही पुढील शक्यता आहे

  1. आधी राज्यसेवा, नंतर गट ब जमेल तसं किंवा फोकस ठरविणे
  2. गट ब चा नंतरचा अभ्यास आता संपविणे किंवा
  3. तुम्हाला योग्य वाटणारी तुमची रणनीती.

दरम्यान मला पुर्ण जाणीव आहे, कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे अनेक परीक्षार्थींचा वेळेचा अपव्यय झाला असेल. तरीही लवकर अभ्यासात सेट व्हा
सध्या दोन प्रकारचे परीक्षार्थी असतील
A. ज्यांच्या डोक्यात स्पर्धापरीक्षा धेय्य आणि त्यासाठी योग्य दिशेतला सातत्य पुर्ण अभ्यास
B. ज्यांच्या डोक्यात कोरोना, करीअर अनिश्चितता, जागा बदलल्यामुळे अभ्यासात मन न रमणे, घरी असल्यामुळे घरचे मित्र आणि इतर अडथळे
यात तुम्ही A मध्ये मोडता की B मध्ये ??? ते ठरवा
त्यानुसारच तुमचा निकाल येईल

नोवल कोराना विषाणुचा प्रादुर्भाव कमीत कमी होईल असे सकारात्मक विचार ठेवुयात. त्यासाठी आपण नागरिक म्हणुन शासानाच्या सर्व आदेशांचे पालन करुया. आपल्या जवळच्यांनाही पालन करायला सांगुया. आहे तिथे राहु या, संसर्ग टाळुया, स्वच्छता ठेवुया जेणे करुन भारत कोरोनो विषाणूविरुद्धचे युद्ध जिंकेल.
दरम्यान आयोग 31 मार्च पर्यंत कोरोना प्रादुर्भाव शक्यता आणि परीस्थिती नुसार आयोग संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक जाहीर करत राहील त्यावर लक्ष ठेवु

एकत्रिक आपणांस कोरोना विरुद्ध आणि नंतर आपापल्या वैयक्तिक पातळीवर स्पर्धापरीक्षेतील युद्ध संयम, शिस्त आणि जिद्दीनेच जिंकायचे आहे , हे लक्षात राहुद्या.

काळजी घ्या, मेहनन घ्या
ही वेळ ही निघून जाईल

  • नितिन बऱ्हाटे
    9867637685
    (लेखक “लोकनीति IAS, मुंबई”चे संस्थापक/संचालक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)